‘तो’ होणार आई, भारतातील पहिला ट्रान्समेल प्रेग्नंट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी ।४ फेब्रुवारी । तिरुअनंतपुरम ।केरळमधील ट्रान्सजेंडर कपल जिया आणि जाहाद यांनी सोशल मीडियावरून त्यांना बाळ होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाम्पत्याने इन्स्टा पोस्टवर काही फोटोही शेअर केले आहेत. कोझीकोडमधील वैद्यकीय कॉलेजच्या डॉक्टरांच्या एका पथकाने म्हटलं की, गर्भधारणा करण्यात दाम्पत्याला कोणत्याही शारिरीक अडचणी नव्हत्या. दोघांनीही लिंग परिवर्तन केलं होतं. केरळमधील ट्रान्सजेंडर कपल जिया आणि जाहाद यांनी सोशल मीडियावरून त्यांना बाळ होणार असल्याचं जाहीर केलं आहे. दाम्पत्याने इन्स्टा पोस्टवर काही फोटोही शेअर केले आहेत. कोझीकोडमधील वैद्यकीय कॉलेजच्या डॉक्टरांच्या एका पथकाने म्हटलं की, गर्भधारणा करण्यात दाम्पत्याला कोणत्याही शारिरीक अडचणी नव्हत्या. दोघांनीही लिंग परिवर्तन केलं होतं.

जिया आणि जाहाद हे दोघेही गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहतात. जिया पुरुष म्हणून जन्मला होता, त्याने लिंगबदल शस्त्रक्रिया करून महिला झाला. तर जाहद एक महिला म्हणून जन्माला आली आणि लिंगबदलानंतर पुरुष बनली. बाळाच्या जन्मानंतर त्याला मिल्क बँकेतून दूध पाजलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय.

जाहद हा भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समेन असेल. सर्जरीवेळी जाहदचे दोन्ही स्तन काढून टाकण्यात आले. पण गर्भाशय आणि इतर काही अवयव तसेच ठेवले होते. त्यामुळे गर्भधारणेत यश आलं.
जाहद हा भारतात बाळाला जन्म देणारा पहिला ट्रान्समेन असेल. सर्जरीवेळी जाहदचे दोन्ही स्तन काढून टाकण्यात आले. पण गर्भाशय आणि इतर काही अवयव तसेच ठेवले होते. त्यामुळे गर्भधारणेत यश आलं.

जियाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, मी जन्माने किंवा शरिराने महिला नव्हते, माझ्यात एक स्त्री होती. तिचं स्वप्न होतं की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं. जियाने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं की, मी जन्माने किंवा शरिराने महिला नव्हते, माझ्यात एक स्त्री होती. तिचं स्वप्न होतं की माझंही एक बाळ असावं आणि ते मला आई म्हणावं.

ट्रान्सजेंडर कपलने एका बाळाला दत्तक घेण्याची तयारी केली होती. याबाबत त्यांनी पूर्ण प्रक्रिया जाणून घेतली होती. पण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचं त्यांच्यासमोर आव्हान होतं. ट्रान्सजेंडर कपल असल्यानं दोघांनाही ते अडचणीचं ठरल्याने अखेर त्यांनी निर्णय बदलला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *