महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ फेब्रुवारी । नाना काटे यांचा उमेदवारी अर्ज भरतांना वंचितचे शहर अध्यक्ष न दिसल्याने तायडेंना प्रश्न विचाला असता ते बोलले की कदाचित महाविकास आघाडीला (राष्ट्रवादी पक्षाला) वंचितची गरज नाही म्हणूनच की काय आम्हाला बोलावले नाही पण ही बाब आम्ही बाळासाहेब आबेडकरांना कळवू यावर निर्णय तेच घेतील पण आम्ही या घटनेने नाराज झालो आहोत असे वंचितचे अध्यक्ष इं. देवेंद्र तायडे यांनी सांगीतले.
