Turkey Syria Earthquake : तुर्कीला भूकंपामुळे आतापर्यंत मृतांची संख्या 8 हजारांच्या पुढे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ८ फेब्रुवारी । Turkey Syria Earthquake : तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी (6 फेब्रुवारी) झालेल्या 7.8 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत एकूण 8000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. भूकंपामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक इमारती पत्त्याच्या घरासारख्या कोसळल्या आहेत.

तुर्कीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, 6 फेब्रुवारी रोजी कहरामनमाराश परिसरात झालेल्या 7.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर आतापर्यंत एकूण 435 भूकंपांची नोंद झाली आहे.भूकंपानंतर मदत आणि बचाव कार्यासाठी आतापर्यंत एकूण 60,217 कर्मचारी आणि 4,746 वाहने आणि बांधकाम उपकरणे तैनात करण्यात आली आहेत.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार असोसिएटेड प्रेसने तुर्की आणि सीरियामध्ये शक्तिशाली भूकंपांमुळे आतापर्यंत 7,700 लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. या व्यापक विध्वंसा दरम्यान मृतांची संख्या वाढतच आहे.

 

तुर्कस्तानमधील भूकंपानंतर जगभरातील देशांनी मदतीचा हात पुढे केला आहे, एकूण 70 देशांचे पथक मदत आणि बचाव कार्यासाठी तुर्कीमध्ये पोहोचले आहे. पण तुर्कस्तानचे खराब हवामान मदत आणि बचावासाठी अडथळा ठरत आहे.

भारताने देखील पाठवली मदत

तुर्कस्तानमधील भूकंपानंतर भारतानेही तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने मदत साहित्य, उपकरणे आणि लष्करी जवानांची चार सी-17 विमाने पाठवली आहेत. यासोबतच 108 टनांपेक्षा जास्त वजनाची मदत पॅकेज तुर्कीला पाठवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *