महाराष्ट्र 24 – दि 10 – पिंपरी चिंचवड हद्दीतील शेतकरी बांधवांना ४६ वर्षांपासून साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आलेला नाही. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौर्याला पिंपरी, निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांच्यावतीने जाहीर विरोध करण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या मुंबई दौर्यासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.
देशातील शेतकरी बांधवांना बैठीस धरले जात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील शेतकरी बांधवांना ४६ वर्षांपासून साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात येत नाही गेल्या अधिवेशनात १५ दिवसांत साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्याची घोषणा करण्यात आली होती आजतागायत शेतकरी बांधवांना साडेबारा टक्के जमीन भूखंड परतावा देण्यात आला नाही ह्याचा जाहीर निषेध व्यक्त करुन पिंपरी चिंचवड येथील शेतकरी बांधवांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौरा ला जाहीर विरोध असून आमची भूमिका शेतकरी बांधवांना न्याय मिळावा ही असून केंद्र सरकारने व राज्य सरकार ह्यांनी शेतकरी बांधवांची घोर फसवणूक केली असल्यामुळ पंतप्रधानांच्या मुंबई दौर्यासाठी काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्यात येणार आहे.