Sharad Pawar: अजितदादांना CM करण्याच्या चर्चेवर शरद पवार स्पष्टचं बोलले ; म्हणाले …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ फेब्रुवारी । अजित पवारांना मुख्यमंत्री झालेलं पहायला आवडेल, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी नुकतीच व्यक्त केली होती. त्यामुळं आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटलं आहे. दरम्यान, यावर शरद पवारांनीही भाष्य केलं आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. (Sharad Pawar spoke clearly on discussion of making Ajit Pawar as CM)

शरद पवार म्हणाले, “कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडं शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळं त्यावर भाष्य करणं मला योग्य वाटत नाही”

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी नुकतंच कार्यकर्त्यांना उद्देशून एक जाहीर विधान केलं होतं. यामध्ये त्यांनी म्हटलं की, “आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल आपल्यालाला आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यामुळं कामाला लागा” विशेष म्हणजे अजित पवारांसमोरच त्यांनी हे विधान केलं होतं. लंकेबरोबरच राष्ट्रवादीच्या इतरही अनेक आमदारांची आणि कार्यकर्त्यांनी अशीच इच्छा असल्यानं लंकेंच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *