महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ११ फेब्रुवारी । भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने अदानी समूहाला मोठा धक्का दिलाय. अदानी समूहात आता नवीन गुंतवणूक न करण्याचा निर्णय एलआयसीने घेतलाय. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे एलआयसीने हा निर्णय घेतलाय. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहाला मोठे आर्थिक धक्के बसत असून, एलआयसीच्या या निर्णयामुळे अदानी समूहाचे शेअर्स आणखी घसरू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.