![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ११ फेब्रुवारी । अजय विघे| कोपरगाव सूर्यतेज संस्थेच्यावतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत तालुका कलाशिक्षक संघ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बाल रंगभूमी परिषद, अहमदनगर यांच्या विशेष सहकार्यातून शिवजयंती उत्सव २०२३ निमित्ताने रविवार दि. १९ फेब्रुवारी रोजी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सूर्यतेजचे संस्थापक वनश्री सुशांत घोडके यांनी दिली.
जागर शिवविचारांचा, उत्सव रयतेच्या राजांचा हे या उत्सवाचे ब्रीद असून स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. स्पर्धेसाठी एकूण ७ गट तयार करण्यात आले असून प्रत्येक गटास स्वतंत्र विषय देण्यात आले आहेत. गट-अ (इ. १ ली २ री) विषय या स्पर्धकास छापिल चित्र देण्यात येणार असून त्याने रंगकाम करावयाचे आहे. गट- ब (इ. ३ री ४ थी) विषय, निसर्गाचा देखावा, गड किल्ले, आवडता वन्यजीव, गट- क (इ. ५ वी ६ वी ) विषय- वृक्षारोपण आणि संवर्धन, स्वच्छ सुंदर हरित कोपरगाव, गट- ड
(इ. ७ वी ८ वी) विषय- शिवकालिन लोककला, शिवरायांचे बालपण, गट- इ (इ. ९ वी १० वी) विषय- ऐतिहासिक स्थळ, मर्दानी खेळ, स्वच्छ भारत अभियान, गट – फ (खुला गट) विषय : छत्रपती शिवाजीराजे आज असते तर…, शिवराज्याभिषेक सोहळा, रयतेचा राजा, गट-ग) दिव्यांग (मूकबधीर) विषय- दिव्यांगांना समजलेल्या छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंग याप्रमाणे विषय ठेवण्यात आले आहेत.
प्रत्येक गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि गुणवत्ता क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, वृक्ष रोप देऊन सन्मानित करण्यात येईल. सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकास प्रमाणपत्र’ देण्यात येईल. स्पर्धेसाठी प्रत्येक स्पर्धकाला फक्त कागद आयोजकांकडून देण्यात येईल. स्पर्धकाने रंग साहित्य, हाताखाली पॅड स्वतःचे आणावयाचे आहे. स्पर्धकाने आपल्या कल्पनाशक्तीला वाव देऊन चित्र रेखाटून रंगकाम करावे. छापील चित्रांची पुनरावृत्ती टाळावी.
स्पर्धकास रंग माध्यमाचे बंधन नाही. चित्र रेखाटून रंगविण्यास दिलेली वेळ बंधनकारक आहे. चित्र हे पूर्ण रंगविलेले असावे. विद्यार्थ्याने आपली नावे शाळेतील कला शिक्षकांकडे नोंदवावी. प्रत्येक शाळेतून गट अ (१ली, २री), गट ब (३री, ४थी) करिता ५ स्पर्धकांचा सहभाग असावा. आणि गट क, ड, इ (५वी, १०वी) प्रत्येकी १० स्पर्धकांचा सहभाग असावा. परीक्षकांचे निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके, स्पर्धा प्रमुख अतुल कोताडे, कलाध्यापक संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, डॉ. हर्षद आढाव, मुख्याध्यापक दत्तात्रेय गवळी, प्रा. लता भामरे, अॅड. स्मिता जोशी, प्रा. कल्पना गिते, कैलास सूर्यवंशी, प्रा. बी. एस. बाघ, प्रा. अनिल अमृतकर, अॅड. महेश भिडें, डॉ. निलिमा आव्हाड, प्राजक्ता राजेभोसले, रवींद्र भगत, अनंत गोडसे, सुमित शिंदे, अजय कांगणे, अमोल पवार, आनंद टिळेकर आदी प्रयत्नशील आहेत.