Horoscope Today दि .१२ फेब्रुवारी ; आज या राशीना मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल ; पहा बारा राशींचं भविष्य.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १२ फेब्रुवारी ।

मेष
नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. घरातील वयस्कर मंडळींची काळजी घ्यावी. अधिकारी व्यक्तींची ओळख होईल. नवीन लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध जोडले जातील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

वृषभ
शासकीय कामे मार्गी लागतील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल.भागिदारीतून लाभ संभवतो. कामात चलबिचलता आड येऊ शकते. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. वाहनविषयक कामे पार पडतील.

मिथुन :
व्यवसायात नवीन तंत्र आणू शकाल. जुनी येणी वसूल होतील.आपला मान जपण्याचा प्रयत्न करावा. मनातील निराशा दूर सारण्याचा प्रयत्न करावा. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कामातून आनंद शोधावा.

कर्क :
कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.नवीन विषयात रुची दाखवाल. करमणुकीचे कार्यक्रम पहायला जाल. भावंडांना मदत कराल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा.

सिंह :
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मानसिक अस्वस्थता जाणवेल.दिवसभर कामात गुंतून राहाल. टापटिपीकडे विशेष लक्ष द्याल. छुप्या शत्रूंचा विरोध मावळेल. जमिनीच्या कामात रस घ्याल.

कन्या :
मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. आरोग्यात सुधारणा होईल. हातातील कामे सुरळीत पार पडतील. वैवाहिक जीवनाला बहर येईल.

तूळ :
राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.भावंडांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. हातापायाला किरकोळ इजा संभवते. चुकीच्या मार्गाचा अवलंब करू नका.

वृश्‍चिक :
धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. जिद्द व चिकाटी वाढेल.तुमचा मान वाढेल. चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. खर्चाला नवीन वाटा फुटू शकतात. कुटुंबात तुमचा दबदबा राहील.

धनू :
महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.घाईने कोणतेही काम करू नका. कौटुंबिक समस्यांकडे अधिक लक्ष द्यावे. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. थोडे धाडस दाखवावे लागेल.

मकर :
आरोग्य उत्तम राहील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.नवीन गोष्टींची जबाबदारी वाढू शकते. सामाजिक वादात पडू नये. धार्मिक ग्रंथांचे वाचन करावे. काही खर्च अचानक येवू शकतात.

कुंभ :
आज शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ संभवतो. वेळेचे महत्व लक्षात घ्यावे. योग्य नियोजनावर भर द्यावा.

मीन :
काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. आरोग्य उत्तम राहील.मैत्रीचे संबंध सुधारतील. मनाजोगी खरेदी करता येईल. कामाच्या ठिकाणी बदलीचे वारे वाहू लागतील. सर्वांशी मिळूनमिसळून वागाल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *