अखेर शेतक-यांचा संयमाचा बाण तुटला.* *रोखलेले पिक विम्याचे पैसे मिळण्यासाठी तिव्र आंदोलन.; प्रशांत डिक्कर

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – बुलढाणा – विशेष प्रतिनिधी – गणेश भड – कोरोणा रोगाच्या दहशतीच्या वातावरणात बँकानी कर्ज खात्यात जमा केलेली खरीप पीक-विम्याची रक्कम शेतक-यांना मिळण्यासाठी बँका विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा ईशारा स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जिल्हाधिकारी यांना आज दि.१९ मे रोजी निवेदनातुन दिला आहे.

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेले आहे. त्यामुळे भारत देशामध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शासनाने तिसऱ्यांदा लॉक डाऊन जाहीर केले. या लॉक डाउन मुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले असुन विम्याच्या पैशासाठी शेतकरी बँकेत चकरा घालुन हैराण झाले आहेत. कारण पेरणीचे दिवस जवळ आल्याने शेतक-यांच्या चिंतेत अधिक भर पडत आहे. शेतक-यांना शेती च्या मशागतीचे, रासायनिक खते, बी बियाणे, खरेदी करण्याकरीता शेतक-यानकडे पैसा नाही. तसेच कुटूंबाचा उदार निर्वाह चालवण्यासाठी लागणारा खर्च कोठुन आणायचा ह्या विवंचनेने शेतकरी पुर्णपणे हतबल झालेला आहे.

हिच सर्व शेतक-यांची कमजोरी तपासुन बँकानी खरीप पिक-विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करुण शेतक-यांनवर दुहेरी संकट निर्माण करण्याच काम ह्या बँकानी केले आहे.
या महामारीच्या कोरोनाच्या पार्शभुमीवर बँकानी शेतक-यांचा पिक-विमा शेतक-यांना न देता कर्ज खात्यात जमा केला हे पुर्णपने चुकिचे आहे. वास्तविक सरकारने शेतक-यांचे कर्ज माफ केले आहे. ह्या कोरोणामुळे उर्वरीत शेतक-यांची कर्जाची रक्कम शासनाकडुन मागे पुढ बँकामधे जमा होईल. त्यामुळे बँकाना शेतक-यांची पिक विम्याची रक्कम कर्ज खात्यात जमा करण्याची कोणत्याही प्रकारची गरज नाही. शेतकऱ्यांन जवळ सध्या परिस्थितीमध्ये पिकविम्या शिवाय दुसरा कुठलाही पैसा नाही.

त्यामुळे कोरोणा महामारी च्या संकटामधे कर्ज खात्यात जमा केलेले शेतकऱ्यांचे पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देण्यात यावे, अन्यथा दोन दिवसात बँकांनी पिक विम्याची रक्कम शेतक-यांना देण्या बाबत निर्णय न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाभर बँका विरोधात शेतक-यांचा पिक विमा मिळण्यासाठी परिणामाची चिंता न करता तिव्र आंदोलन करणार असल्याचा ईशारा स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.निवेदनावर रोशन देशमुख,रामा रोठे,बाळु वहीतकार,संतोष मानकर,विजु गोमासे,रामेश्वर घाटे,शांताराम अवचार,स्वप्निल देशमुख,सह ईत्यादीच्या सह्या आहेत,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *