महाराष्ट्र 24 – प्रतिनिधी अजय विघे – दि.12 फेब्रुवारी – सध्या अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर व्हावे यासाठी सर्व स्तरातून मागणी होत आहे या पार्श्वभूमीवर जागृती निर्माण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर नामांतर कृती समितीच्या वतीने अहिल्यादेवींचे जन्मगाव असलेल्या चोंडी ते जिल्हाधिकारी कार्यालय,नगर शहर ही रथयात्रा काढण्यात येणार आहे .
सर्वच तालुक्यातुन ही रथयात्रा जाणार असुन तळेगाव मार्गे या रथयात्रेचे आगमन कोपरगाव तालुक्यात दि.१३ फेब्रुवारी रोजी होणार आहे या रथयात्रेतील मुख्य कार्यक्रम सकाळी ९ वाजता कोळपेवाडी येथे तर दुपारी १२ वाजता कोपरगाव येथे होणार असुन दरम्यान च्या प्रवासात विविध गावे स्वागत, मोटारसायकल रॅली व विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे.तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतींचे ठराव व मागणीपत्रे समितीकडे देण्यात येणार आहेत.या रथयात्रेत उस्फुर्त सहभागी होण्याचे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्षत्रिय धनगर समाज सेवा संघ यांनी व माजी सरपंच सचिन कोळपे यांनी केले आहे.