महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । Oversleeping Side Effects : आपल्या चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्त्वाचे असते. म्हणून बऱ्याच आरोग्य तज्ज्ञांकडून दररोज सात ते आठ तास झोपण्याचा सल्ला देण्यात येतो. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी रात्री झोपणे गरजेचे असते.
त्यामुळे तुम्हाला फ्रेश वाटते आणि तुम्ही काम करताना त्या कामात अडथळे येत नाहीत. चांगल्या आरोग्यासाठी ८ तास झोप घेणे गरजेचे असते.कमी झोपणे आरोग्यासाठी वाईट असते तसेच जास्ती झोपणे देखील आरोग्याच्या समस्या निर्माण करू शकते. चला तर मग जाणून घेऊया जास्ती झोपण्याचे काही तोटे.
1. हृदयविकार
तुम्ही दररोज सात ते आठ तासापेक्षा जास्त झोपत असाल तर ही सवय बंद करायला हवी. त्यासाठी तुम्ही आलार्मचा उपयोग करू शकता किंवा घरातील व्यक्तींची मदत घेऊ शकता, तुम्ही आठ तासापेक्षा जास्ती झोप घेतल्यास हृदयविकारचा धोका वाढण्याची शक्यता असते. जास्ती वेळ विश्रांती घेतल्याने कोरोनरी आर्टरी डिजीज होण्याचा धोका असतो.
2. डोकेदुखी
तुमचा थकवा दूर करण्यासाठी आठ तासाची झोप पुरेशी असते.परंतु जर तुम्हाला यापेक्षा जास्त झोपण्याची सवय असेल तर त्यामुळे डोकेदुखीचा (Headache) त्रास वाढू शकतो आणि हा डोकेदुखीचा त्रास लवकर कमी होत नाही. म्हणून तुम्हाला जर जास्त झोपण्याची सवय असेल तर त्वरित बंद करावी.
3. लठ्ठपणा
जास्ती झोपल्याने लठ्ठपणाच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मर्यादित झोप घेणे गरजेचे असते. जास्त वेळ झोपून राहिल्याने शारीरिक हालचालीसाठी वेळ (Time) मिळत नाही परिणामी पोट आणि कमरेची चरबी वाढते त्यामुळे पुढे चालून मधुमेह (Diabetes) आणि उच्च रक्तदाबाच्या समस्याचा धोका वाढू शकतो.
4. उदासीनता
जे लोक झोपेवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत ते नैराश्यला बळी पडतात. त्याप्रकारे कमी झोप तणावाचे कारण बनते तसेच जास्ती झोपल्याने देखील तणाव निर्माण होतो आणि चिंता वाढते त्यामुळे दररोज आठ तास झोप घेणे आवश्यक आहे त्यामुळे जास्ती किंवा कमी झोप आरोग्यासाठी (Health) धोका निर्माण करू शकतात.