महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । बारा ज्योतिर्लिंगापैकी एक केदारनाथ धाम आहे. महाभारताचे युद्ध संपल्यानंतर हे ज्योतिर्लिंग पांडवांनी बांधले होते.अशा या जगप्रसिद्ध केदारनाथ धाम उघडण्याची तारीख महाशिवरात्रीच्या दिवशी जाहीर करण्यात येणार आहे.
त्यावेळी केदारनाथ धाम हर हर महादेवाच्या जयघोषाने दमदमुन जातो.बद्रीनाथ धाम चे दरवाजे उघडण्याची तारीख ही निश्चित करण्यात आले आहे. बद्रीनाथ धामचे दरवाजे 27 एप्रिल सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी उघडतील. हे उत्तराखंडच्या चामोली जिल्ह्यात स्थित आहे.
तसेच गडू खडा तेल कलश यासाठी 12 एप्रिल ही तारीख ठरवण्यात आली आहे. पूर्ण भारतातून अनेक लोक (People) या यात्रेला हजेरी लावतात. परंपरेनुसार या शुभ सोहळ्याची घोषणा केदारनाथ धामचे रावल भीमाशंकर लिंग, उखीमठ, ओंकारेश्वर मंदिर, पंचकेदार गड्डीस्थन करण्याचे निश्चित केले आहे.
दरवर्षी महाशिवरात्रीच्या उत्सवानिमित्त भगवान केदारनाथ (Kedarnath) धामचे दरवाजे उघडण्याची तारीख घोषित करण्यात येते. पंचमीच्या मुहूर्तावर बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्याची तारीख ठरवण्यात येते ही परंपरा फार वर्षापासून सुरू आहे. एकदा का तारीख निश्चित झाली की केदारनाथ यात्रा ची तयारी सुरू होते. या यात्रेत हजारो भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
महाशिवरात्रीचा उत्सव भारतात खूप उत्साहाने मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण देशात वेगवेगळ्या मंदिरात देवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांची गर्दी होत असते. त्यामूळे महाशिवरात्री या शुभ मुहूर्तावर केदारनाथ धाम चे उघडण्याचे ठरवतात.
त्याआधी मुहूर्तावर बद्रीनाथ आमचे दरवाजे उघडण्याची तारीख जाहीर करतात. या तारखा जाहीर झाल्यानंतर लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होते देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहतात.