महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । १५ फेब्रुवारी । Pune Incomtax Raid : पुण्यात आयकर विभागाकडून (Income Tax) पुण्यात सहा ठिकाणी छापेमारी सुरू आहे. यामध्ये सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे (Aniruddha Deshpande) यांचा समावेश आहे. अनिरुद्ध देशपांडे हे पुण्यातील बडे उद्योजक आहेत. सिटी कॉर्पोरेशनचे डायरेक्टर आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा आहेत. अनिरुद्ध देशपांडे यांच्या घराची कार्यालयाची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.