महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे । १५ फेब्रुवारी । पिंपरी चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आम आदमी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज भरण्यात आला.ए बी फॉर्म मधील गोंधळ प्रकरणी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांना एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले,तर राज्य सचिव धनंजय शिंदे यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.
आप महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी ही कारवाई केली आहे.
पिंपरी चिंचवड विधानसभेच्या निवडणुकीचा अर्ज भरताना उमेदवार मनोहर पाटील यांना ए बी फॉर्म कोरा देण्यात आला.तसेच 10 अनुमोदकांच्या सह्या न घेता फॉर्म भरण्यात आला.प्रभारी हरिभाऊ राठोड म्हणाले,ए बी फॉर्मचा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे.राज्याचे सचिव धनंजय शिंदे यांची ए बी फॉर्म देण्याची जबाबदारी आहे व स्व:त हजर असताना हा प्रकार घडल्यामुळे आपची नाहक बदनामी झाली आहे.त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस दिली आहे.