महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १७ फेब्रुवारी । भगवान शंकराची अनेक मंदिरं देशात आणि महाराष्ट्रात आहेत. जिथं वर्षभर भाविकांची ये-जा सुरुच असते. (Maharashtra shiva templs) त्यातीलच काही प्राचीन मंदिराची थोडक्यात माहिती घेऊ .
# पुण्यातील भीमाशंकराचं मंदिरसुद्धा तितकंच प्राचीन आणि रेखीव आहे. इथं येण्यासाठी रानवाटेचा थरारक मार्गही तुम्ही निवडू शकता.
# हरिश्चंद्र गडावर जाण्याची संधी मिळाल्यास तिथं असणाऱ्या हरिश्चंद्रेश्वराच्या केदारेश्वर गुफेला नक्की भेट द्या. इथं 5 फूट उंचीचं प्राचीन शिवलिंग पाहायला मिळतं. बर्फाइतक्या थंड पण्यानं वेढलेल्या या शिवलिंगाच्या बाजूंना चार खांब आहेत. हे खांब म्हणजे चार युगं आहेत अशी मान्यता आहे.
# महाबळेश्वरला तुम्ही फिरण्याच्या निमित्तानं जात असाल तर, एकदा इथल्या महाबळेश्वर शंकर मंदिराला नक्की भेट द्या. बाहेर सूर्य आग ओकत असताना इथल्या मंदिरात मात्र प्रचंड गारवा आणि निस्सिम शांतता जाणवते.
# बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारं नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचं मंदिर हे पुरातन आहे. या प्राचीन मंदिराचं स्थापत्य नजर रोखणारं आहे.
# कोल्हापूरातील नरसोबाच्या वाडीपासून 22 किमी अंतरावर असणारं हे आहे कोपेश्वराचं मंदिर. साधारण 1700 वर्षांपूर्वीचं हे मंदिर महाराष्ट्रातील खजुराहो म्हणून ओळखलं जातं. या मंदिरात नंदी नाही ही महत्त्वाची बाब. असं म्हणतात की देवी सती वडिलांकडे नंदी या शंकराच्या वाहनावरून गेली होती. त्यामुळं त्यावेळी तिथं शंकरासोबत नंदी नव्हता. इथं नंदीसाठी वेगळं मंदीर आहे. कोपेश्वर मंदिरात दोन शिवलिंग आहेत.
# कोकणातील समुद्रकिनारी स्थिरावलेलं हे आहे श्री देव कुणकेश्वर मंदिर. साधारण 70 फूट उंच हे मंदिर अनेकांसाठी आकर्षणाचा विषय.