पोटातील जंतांसाठी ‘हे ’ घरगुती उपाय आहेत आरामदायी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १८ फेब्रुवारी । जेव्हा तुमच्या पोटात जंत असतात तेव्हा ते शरीराला अन्नातून मिळणाऱ्या पोषक तत्वांचा फायदा घेऊ देत नाहीत. त्यामुळे पोटात समस्या निर्माण होऊ शकते आणि हळूहळू शरीर कमजोर होऊ लागते. सहसा असे स्वच्छतेची काळजी न घेतल्याने आणि काही चुकीचं खाल्ल्याने घडते. विशेषतः लहान मुलांना अशा समस्या जास्त असतात. पोटात जंत असल्याची शंका असल्यास स्वयंपाकघरातील वस्तूंच्या मदतीने त्यापासून सुटका मिळवू शकता.

कलोंजी
कलोंजीमध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म आढळतात जे आपल्या पोटासाठी फायदेशीर मानले जातात. १० ग्रॅम कलोंजी पावडर ३ चमचे मधात मिसळून रात्री झोपण्यापूर्वी खाल्ल्यास जंत दूर होतात.

काळी मिरी
काळी मिरी हा तो मसाला आहे, ज्याच्या वापराने अनेक पदार्थाची चव वाढते, एक ग्लास ताकात थोडी काळी मिरी पावडर मिसळून रात्री प्यायल्यास पोटातील जंत मरतात.

मध
मध आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो, त्यात अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. ओवा मधात मिसळून दिवसातून तीनदा प्यायल्याने जंत मरतात.

मुळा
हिवाळ्यात मुळा खाणे खूप फायदेशीर मानले जाते. या ऋतूत पोटात जंत असल्यास मुळ्याचा रस काढा, त्यात काळी मिरी पावडर आणि काळे मीठ मिसळून दिवसातून दोनदा प्या.

गाजर
गाजर ही अतिशय पौष्टिक फळभाजी म्हणून खाल्ली जाते. पोटातील जंत काढण्यासाठी गाजराचे पेय तयार करून ते ४ ते ५ दिवस प्यावे. यामुळे तुम्हाला चांगला परिणाम मिळेल.

( वरील बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे, अधिक माहितीसाठी वैद्यांचा सल्ला नक्की घ्यावा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *