लोकांना मदत करण्यासाठी इतके पैसे कुठून आणतोस? अखेर सोनू सूदने उघड केलं गुपित, म्हणाला…

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० फेब्रुवारी । अभिनेता सोनू सूद त्याच्या अभिनयापेक्षा आता सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्यानं ज्याप्रकारे देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली त्याचं सर्वत्र कौतुक झालं आहे. सोनूने त्याकाळात स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले. त्याच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक झाले. फक्त इतकेच नाही तर सोनू त्याच्याकडे मदतीचा हात मागणाऱ्यांना नेहमीच मदत करताना दिसतो. आता हे सगळं करण्यासाठी तो कुठून पैसे आणतो हे त्याने उघड केलं आहे.

सोनू सूदने आतापर्यंत करोडो रुपये खर्च करून लोकांची मदत केली आहे. त्याच्या या कार्यामुळे त्याला लोक मसीहा म्हणू लागले आहेत. अलीकडेच तो ‘आप की अदालत’ या कार्यक्रमामध्ये दिसला. यावेळी त्याला रजत शर्माने “लॉकडाऊनच्या काळात इतके मजूर आणि विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यासाठी पैसे कुठून आणले?” असा प्रश्न विचारल्यावर सोनूने त्याने पैसे कुठून आणले याचा खुलासा केला.

तो म्हणाला, “मी जेव्हा हे काम करायला सुरुवात केली तेव्हा लोकांकडून येणारी मागणी बघताच मला कळलं होतं की दोन दिवसही आपण टिकू शकणार नाही. मग मी यात कशी भर घालायची याचा विचार केला. तेव्हा मी ज्या ब्रँड्सवर काम करत होतो त्यांना मी डोनेशनसाठी वापरले. या कामासाठी मी हॉस्पिटल्स, डॉक्टर्स, कॉलेज, शिक्षक, फार्मास्युटिकल कंपन्यांना काम लावले. मी त्यांना म्हणालो की, मला ब्रँड लूक हवा आहे, त्यासाठी मी मोफत काम करायला तयार आहे. अशाप्रकारे ते माझ्या कामात माझ्याशी सोडत गेले.”

पुढे तो म्हणाला, “काही बड्या एनजीओंनी मला फोन करून सांगितलं की, “देशाची लोकसंख्या १३० कोटी आहे. तू हे करू शकणार नाहीस.” त्यांना मी म्हणालो, “ते सर्व माझी मदत मागण्यासाठी माझ्या घराखाली उभे आहेत. मी त्यांना नाकारू शकत नाही.” आज जम्मूपासूनकन्याकुमारीपर्यंत कोणत्याही लहान जिल्ह्यात किंवा लहान राज्यात, कोणीही, कुठेही, तुम्ही फक्त सांगा, मी कोणाला शिक्षण पूर्ण करण्यास मदत करू शकतो, मी कोणाला उपचार मिळवून देऊ शकतो, मी कोणाला नोकरी मिळवून देऊ शकतो, तुम्ही फोन करा, मी नक्की मदत करेन.” आता त्याचं हे बोलणं खूपच चर्चेत आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *