पुढचे 2 दिवस तापमान 39 अंशावर, कोकणात उष्णतेची लाट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० फेब्रुवारी । राज्यात उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. पुढचे दोन दिवस कमाल तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तर कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट निर्माण होण्याची भीती आहे. मुंबईमध्ये आकाश निरभ्र राहणार असल्यानं तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवारी मुंबईमध्ये 37.9 अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली होती. तर रत्नागिरीमध्ये 38.3 एवढं तापमान नोंदवण्यात आलं होतं.

मध्य महाराष्ट्रात काय स्थिती?

राज्याच्या इतर भागांबाबत बोलायचे झाल्यास मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये कमाल तापमान 33 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली असून, सोलापूरमध्ये 36. 4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भात देखील सूर्य तळपत असून, अनेक जिल्ह्यांत सरासरी तापमानापेक्षा 2 ते 3 अंश सेल्सिअसने अधिक तापमानाची नोंद झाली आहे.

रत्नागिरीमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता

प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमान तापमान अधिक राहणार असून, उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. रत्नागिरीसोबतच कच्छमध्ये देखील उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यात आहे. मात्र राज्याच्या इतर भागात उष्णतेची लाट येणार नसल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *