महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० फेब्रुवारी । नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने येणार आहेत. पहिल्यांदाच उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे अशी केस सर्वोच्च न्यायालयात दाखल होणार आहे. ठाकरे गटाला याचिका सर्वोच्च न्यायालयातच दाखल करावी लागणार आहे. त्यामुळे ठाकरे गटासमोरच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ठाकरे गटासाठी करो, या मरो ची परिस्थिती निर्माण झाल्याचं ज्येष्ठ वकिलांचं मत आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात जर याचिका दाखल झाली तर पहिल्यांदाच शिंदे-ठाकरे एकमेकांविरोधात न्यायालयात येणार आहेत.