महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २० फेब्रुवारी । तळवडे देहू गाव रुपी नगर पाटिल नगर त्रिवेणी नगर जोतिबा नगर चिखली मोरे वस्ती टावर लाईन ह्या ठिकाणी संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा लँड माफिया नागरिकांना खोटे आश्वासन देऊन भूलथापा मारून खरेदी विक्री व्यवहार करत असून नागरिकांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर झाली असून सदर जागा संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा म्हणून पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांनी जाहीर केली असून सुद्धा दुय्यम निबंधक कार्यालयात संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा खरेदी विक्री व्यवहार करण्यात येत असून नागरिकांची फसवणूक प्रकार घडले असून त्या संदर्भात अप्पर तहसीलदार व पुणे जिल्हाधिकारी साहेब ह्यांना ईमेल करुन तक्रार दाखल करण्यात आली असून सदर संरक्षण क्षेत्रातील बाधित जागा जमीन भूखंड खरेदी विक्री व्यवहार बंदी असूनही खरेदी विक्री व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात आथिर्क देवाण घेवाण करुन करण्यात आले त्या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी .
तसेच लँड माफिया यांच्या विरोधात मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा जेणेकरून नागरिकांना फसवणूक प्रकार पुन्हा घडणार नाही याची दक्षता घ्यावी सामान्य नागरिक आयुष्यभराची कमाई जमवून जागा खरेदी करतो नंतर बँक लोन होत नाही बांधकाम परवाना मिळत नाही जागा एन ए होत नाही इतर अडचणी निर्माण झाल्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मनस्ताप सहन करावा लागत आहे दुसरीकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिका करसंकलन अधिकारी लाखो रुपये घेऊन बांधकाम नावनोंदणी करुन तीन पट कर आकारणी करत आहे ह्याची प्रशासनाने नोंद घेऊन कारवाई करण्यात यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब पुणे जिल्हाधिकारी साहेब अप्पर तहसीलदार पिंपरी चिंचवड शहर ह्यांना तक्रार दाखल करण्यात आली असून कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती सचिन काळभोर सामाजिक कार्यकर्ते पिंपरी चिंचवड शहर