महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . २१ फेब्रुवारी । काळी जीन्स घेण्याचे काही तोटे सुद्धा आहेत आणि ते म्हणजे कितीही ब्रॅंडेड जीन्स घ्या एकावेळेनंतर ती पांढरी दिसायला लागते.हा प्रॉब्लेम खूप गहन आहे कारण अशी पांढरी पडलेली जीन्स घालून ऑफिसला जाणं जरा लाजिरवाण वाटतं, मित्रांमध्येही उगाच कोणी टिंगल करेल का असं वाटू लागतं. पण आता जीन्स फक्त पांढरी झाली किंवा त्यावरती पांढऱ्या लाइन्स दिसायला लागल्या म्हणून ती वापरण सोडणं बरोबर नाही ना?
या सार्वजनिक प्रॉब्लेम वर खूप सोप्पा आणि एकदम स्वस्त उपाय म्हणजे जीन्सला डाय करणं आणि तेही कोणाकडे बाहेर जाऊन नाही तर घरच्या घरी. आता तुम्ही म्हणाल घरच्या घरी कसं डाय कसं करणार? खूप सोप्पं आहे, चला याच्या स्टेप्स बघूयात.
आपल्या लाडाच्या जीन्सचा रंग परत आणा…
स्टेप्स :
१. सर्वात आधी एका पातील्यात पाणी उकळायला ठेवा.
२. आता त्यात ४ चमचे मीठ टाका.
३. पाणी उकळलं की ते एका बादलीत काढून घ्या. ही बादली शक्यतोवर जुनी घ्या, कारण काळा रंग बादलीला राहू शकतो
४. त्यात आता फक्त पाच रुपयाला येणारी काळ्या रंगाची कपडे डाय करण्याची पुडी टाका. ही पुडी तुम्हाला आरामात किराणा दुकानात किंवा कटलरीच्या दुकानात मिळेल.
५. आता एका काठीच्या मदतीने पूर्ण पाणी नीट ढवळून घ्या अन् त्यात आपली जीन्स टाका.
६. ही जीन्स पण काठीने पूर्ण भिजवून घ्या. हात टाकू नका नाहीतर हाताला चटका लागेल.
७. अर्धा पाऊण तासाने पाणी थोडं कोमट झालं की जीन्स आपल्या हाताने जरा फिरवून भिजवून घ्या म्हणजे जीन्सच्या प्रत्येका बाजूला रंग लागेल.
८. तुम्ही ही जीन्स रात्रभर किंवा ४-५ तास तशीच पाण्यात ठेवू शकतात.
९. आता जीन्स त्या पाण्यातून काढून स्वच्छ पिळून घ्या आणि वाळायला ठेवून द्या.
१०. एका दुसऱ्या भांड्यात साधं पाणी घ्या आणि त्यात ३-४ चमचे मीठ घ्या आणि त्यात ही जीन्स दोन तासांसाठी भिजत घाला.
११. एकदा जीन्स स्वच्छ पाण्यात पिळून घ्या आणि परत वाळत घाला.
१२. तुमची जुनी जीन्स अगदी नव्या सारखी तयार आहे.