वर्क फ्रॉम होम आणि बरंच काही…तरीही या नोकरीसाठी कोणीच नाही तयार, काय आहे कारण?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २२ फेब्रुवारी । जेव्हा एखादी व्यक्ती नोकरीच्या शोधात असते तेव्हा त्याच्या मनात पहिला प्रश्न येतो तो म्हणजे पगार, नोकरीची स्थिरता आणि आकर्षक फायदे. मात्र तुम्ही कधी अशा लोकांबद्दल ऐकलं आहे का, जे दरमहा 4 लाख रुपये भरघोस पगार असणारी नोकरी नाकारतात? केवळ पगारच नाही तर हॉलिडे ट्रॅव्हल आणि वर्क फ्रॉम होम देखील याठिकाणी ऑफर केलं जात आहे. अशा आकर्षक ऑफर असूनही, स्कॉटलंडमध्ये या नोकरीसाठी कोणीही मिळत नाही. आता तुम्हालाही हाच प्रश्न पडला असेल की, असं का?

मनीकंट्रोलच्या अहवालानुसार, स्कॉटलंडमध्ये कोस्टल रिगरची रिक्त जागा आहे, जे अॅबरडीनच्या किनाऱ्यापासून उत्तर समुद्रात आहे. ऑनशोर रिग ही मुळात समुद्रावर किंवा समुद्रात असलेली एक मोठी रचना आहे, जी विहिरी ड्रिल करण्यासाठी, तेल आणि वायू काढण्यासाठी आणि परिष्कृत करण्यासाठी तसंच हे सगळं जमिनीवर आणलं जाईपर्यंत ते साठवून ठेवण्यासाठी वापरली जाते.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी अशा लोकांना कामावर ठेवते, जे एकावेळी 6 महिन्यांच्या पोस्टिंगसाठी तयार असतात. व्यक्तीला 12 तासांची शिफ्ट करावी लागते. यासाठी त्यांना दररोज 36 हजार रुपये मूळ वेतन दिले जाते. जर त्या व्यक्तीने तेथे 2 वर्षे राहण्याचं ठरवलं आणि 6-6 महिन्यांचे दोन्ही टप्पे पूर्ण केले, तर त्याला £95,420 (रु. 1 कोटी) पगार मिळतो.

योग्य उमेदवार निवडण्यासाठी कंपनीकडे एकूण चार निकष आहेत. पहिला- BOSIET (बेसिक ऑफशोर सेफ्टी इंडक्शन आणि इमर्जन्सी ट्रेनिंग), 2 – FOET (अतिरिक्त ऑफशोर इमर्जन्सी ट्रेनिंग), तिसरा- CA-EBS (कंप्रेस्ड एअर इमर्जन्सी ब्रेथिंग सिस्टम), आणि 4 – OGUK (OGUK आणि इतर वैद्यकीय प्रशिक्षण कार्यक्रम) यात समाविष्ट आहे. अद्याप पाच पदांसाठी अर्ज स्वीकारले जात असल्याचे कंपनीने म्हटले आहे. या नोकरीसाठी 24 दिवस आधीच नोटीस काढण्यात आली होती मात्र आजपर्यंत कोणीही अर्ज केलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *