Weather Update : सूर्य तळपणार ! पुढील तीन दिवस महत्त्वाचे, हवामान विभागाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । फेब्रुवारी महिना संपायला आला आहे पण उन्हाळा (weather news) सुरु होण्यापूर्वीच सूर्याने आग ओकण्यास सुरुवात केली आहे. सर्वसामान्यांना कामासाठी बाहेर पडताना अंगाची लाही लाही होत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील तीन दिवस धोक्याचे असल्याचा इशारा दिला आहे. उन्हाळा सुरू होण्याआधीच उष्णतेच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलाय. गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असा इशारा दिला आहे. आताच एवढं उन्ह असल्यावर पुढील तीन दिवस आणि उन्हाळ्यात काय होणार या विचाराने सर्वसामान्यांना घाम फुटला आहे. मार्चच्या पहिल्या पंधरावड्यात पारा चाळीशीपार जाण्याचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. (Weather Forecast Maharashtra next three days are important heat wave summer weather news latest marathi news)

25 Feb,अंतर्गत #महाराष्ट्र व तेलंगणाच्या बहुतांश भागांमध्ये; गुजरात, छत्तीसगड,रायलसीमाच्या अनेक भागांवर;SW MP,ओडिशा, CAP,अंतर्गत काही भागांवर तामिळनाडू व केरळ; कमाल तापमान 35-37°C आहे.

अकोल्यात सर्वाधिक तापमान!
राज्यातील उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढ आहेत. अकोल्यात फेब्रुवारीतल्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.
मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भमध्ये कमाल तापमानाने 30 अंश सेल्सिअसचा आकडा पार केली आहे. जळगाव वगळगता इतर शहरांमध्ये किमान तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी मार्च महिन्यातील पहिल्या 15 दिवसांमध्ये देशातील बहुतांश भागांमध्ये तापमान 40 अंशांवर किंवा त्याहूनही जास्त असणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

देशात कुठे उन्ह तर कुठे पाऊस
देशाच्या तापमानाबद्दल बोलायचं झालं तर दिल्लीसह उत्तर भारतात तीव्र उष्णता वाढली आहे. 28 फेब्रुवारीला पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर 27 फेब्रुवारीपर्यंत दिल्लीतील तापमान 33 अंशांवर जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला पश्चिम हिमालयीन भागात पाऊस आणि बर्फवृष्टीचा अंदाज हवामान विभागने वर्तविला आहे.

काळजी घ्या!
दरवर्षीप्रमाणे यावेळीही उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, दिल्ली, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाब, ओडिशा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या कहर होणार आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे उष्णघातापासून बचाव करण्यासाठी आतापासून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं आहे. भरपूर प्रमाणात पाणी आणि गरज नसल्यास बाहेर पडू नका असं त्यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *