Alkaline Diet : अल्कलाईन डाएट म्हणजे काय?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २६ फेब्रुवारी । अल्कलाइन डाएट म्हणजे तुमच्या शरीरात आम्ल तयार करणाऱ्या अन्नपदार्थांऐवजी तुम्ही अल्कलाइन खाद्य पदार्थ (क्षारयुक्त पदार्थ ) सेवन करावे जेणेकरून तुमच्या शरीराचे आरोग्य चांगले राहील आणि पीएच पातळी संतुलित राहिल. हा डाएट फॉलो करणार्‍यांच्या मते कॅन्सरसारख्या घातक आजाराशी लढण्यासाठी हा डाएट खूप प्रभावी आहे. हेल्थलाइन वेबसाइटनुसार क्षारयुक्त आहार तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे जाणून घेऊ या… 

अल्कलाइन डाएट म्हणजे काय?

अल्कलाइन डाएटला अॅसिड-अल्कलाइन डाएट किंवा अल्कलाइन एॅश डाएट असेही म्हणतात. हा आहार तुमच्या शरीराची पीएच पातळी राखण्यास मदत करतो. pH म्हणजे शरीरातील आम्ल आणि अल्कलाइन यांच्यातील संतुलन स्थापित करणे असते. परंतु काहीवेळा शरीरातील चयापचय प्रणाली योग्यरित्या कार्य करत नाही, तर काही वेळा शरीरातील ही रासायनिक क्रिया अतिशय संथ गतीने होते.अशा वेळी पीएच पातळी बिघडू शकते

अल्कलाइन डाएटला पसंती देणाऱ्या लोकांच्या मते जे अन्न पचनाच्या क्रियेदरम्यान न पचलेले अन्न तुमच्या शरीरातील आम्ल किंवा अल्कलाइन (क्षारता) प्रभावित करते. तुम्ही अल्कलाइन डाएट घेतला तर तुमचे आरोग्य अधिक चांगले राहते आणि शरीरात आम्ल जास्त प्रमाणात तयार होत नाही. अल्कलाइन डाएटमध्ये प्रामुख्याने फळे, काजू, हिरव्या पालेभाज्या आणि कंदमुळांचा समावेश असतो.

 

पीएच पातळी म्हणजे काय?

जेव्हा आपण अल्कलाइन डाएटविषयी बोलतो तेव्हा पीएच पातळी समजून घेणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक pH हे एक एकक आहे जे एखादी गोष्ट क्षारीय (क्षारीय) आहे की अम्लीय आहे हे सांगते.

पीएचची पतळी 0 ते 14 च्या दरम्यान असते

एसिडिक: 0.0 ते 6.9

तटस्थ: 7.0

अल्कलाइन किंवा बेसिक: 7.1 ते 14.0

जेवल्यानंतर लगेच का येते झोप? फक्त आळसच नाही तर हे आहे वैज्ञानिक कारण

जर pH समजून घ्यायचे झाले तर त्याला आपण आपल्या शरीरातील द्रव आणि ऊतींचे आम्ल-अल्कलाइन गुणोत्तर म्हणून शकतो. परंतु जेव्हा हे गुणोत्तर बिघडते तेव्हा शरीर खूप अम्लीय होते किंवा अल्कलाइन होते. जेव्हा असे होते तेव्हा शरीरातील अनेक प्रकारचा अशक्तपणा, वृद्धत्वासारखे आजार वाढणे, डीमिनरलायझेशन, थकवा, एन्झाईम्सची बिघडलेली क्रिया, जळजळ सूज आणि शरीराच्या अवयवांचे नुकसान होणे अशा समस्या उद्भवतात.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत कोणताही उपचार करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *