भारताला WTC च्या फायलनमध्ये जाण्याची संधी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । २७ फेब्रुवारी । भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. तिसरा कसोटी सामना १ मार्चपासून इंदूरमध्ये सुरु होणार आहे. भारतानं नागपूरमध्ये आणि दिल्लीमध्ये झालेल्या मॅचमध्ये विजय मिळवला होता. नागपूर कसोटीत एक डाव आणि १३२ धावांनी तर दिल्ली कसोटीत सहा गडी राखून विजय मिळवला होता. रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील टीम इंडिया तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याच्या तयारीत आहे. इंदूर कसोटीत विजय मिळवल्यास टीम इंडियाचं कसोटी विश्वकप स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थान पक्क होऊ शकतं.

इंडियापुढं इंदूर कसोटीत मोठं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाकडून भारताला तगडं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशननं इंदूर कसोटीसाठी होळकर स्टेडियममध्ये लाल मातीची खेळपट्टी बनवली आहे, त्यामळं वेगवान गोलंदाजांना फायदा मिळण्याची शक्यता आहे. खेळपट्टीनं ऑस्ट्रेलियाच्या वेगवान बॉलर्सला साथ दिल्यास मालिकेतील भारताच्या विजयी वाटचालीवर परिणाम होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ मिशेल स्टार्क आणि कॅमरुन ग्रीन यांना संघात संधी देण्याची शक्यता आहे.

भारत तीन वेगवान गोलंदाजांसह उतरणार

भारताला इंदूर कसोटीत विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे. त्यामुळं भारत इंदूर कसोटीत तीन वेगवान गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारतानं तीन फिरकीपटू उतरवले होते. आता तिसऱ्या कसोटीत टीम इंडिया एका वेगवान गोलदाजांला संधी देऊ शकते.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील सध्याच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये फिरकीपटूंचा वरचष्मा राहिला आहे. ५२ विकेट फिरकीपटूंनी घेतल्या आहेत. मात्र, इंदूर कसोटीत हे चित्र बदलण्याची शक्यता आहे.

उर्वरित दोन सामन्यांसाठी कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार) केएल राहूल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एस. भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव

तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ

स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), स्कॉट बॉलंड, एलेक्स कैरी (विकेटकीपर) कॅमरुन ग्रीन, पीटर हँडसकॉम्ब,ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मॅथ्यू कुहमॅन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *