महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ फेब्रुवारी । बच्चू कडू यांची सर्वसामन्यांच्या प्रश्नांसाठी झगडणारे नेते अशी ओळख आहे. यामुळेच बच्चू कडूंची लोकप्रियता खूप जास्त आहे. मात्र 80 वर्षाच्या आजोबांनी बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून आपण जनतेसोबत गद्दारी केली. आपण गद्दार आहात असं थेट म्हटलं आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
80 वर्षाच्या व्यक्तीने बच्चू कडू यांना कोर्टातून बाहेर येताना अडवून आपण जनतेसोबत गद्दारी केली आपण गद्दार आहात असं म्हटलं pic.twitter.com/YESQaJwaC7
— kailas chaudhari 90 (@kreporter2014) February 28, 2023
अर्जुन भगवान घोगरे असं 80 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. कोर्टाच्या आवारातच या व्यक्तीने बच्चू कडू यांच्या गाडीच्या समोर जात गाडी अडवून धरली. आपण गुंडांसोबत गेलात असं त्यांनी बच्चू कडू यांना म्हटलं. यावेळी बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांना या आजोबांना अनेकदा बाजूला केले पण ते आपलं म्हणणं ठामपणे मांडत होते.