महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०२ मार्च । अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. एकीकडे कसब्यात काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्ल्यावर झेंडा फडकावला आहे. तर चिंचवडमध्ये महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. राहुल कलाटे यांनी तब्बल 13 हजारांपेक्षा जास्त मतं मिळवली आहे.
चिंचवडमध्ये आतापर्यंत 13 व्या फेरीचे मतदान पूर्ण झाले आहे. अश्विनी जगताप यांना 46320 मतं मिळाली आहे. तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांना 37962 मतं मिळाली आहे. तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना 14171 मतं मिळाली आहे. त्यामुळे कलाटे यांच्या बंडखोरीचा नाना काटे यांना फटका बसला आहे. जर नाना काटे यांनी उमेदवारी दाखल केली नसती तर सर्वाधिक मतही नाना काटे यांनी पडली असती. त्यामुळे नाना काटे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला असता. पण, कलाटे यांच्या उमेदवारीचा भाजपला फायदा झाला आहे.