खरच टीम इंडिया WTC फायनलमध्ये पोहोचेल का?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ३ मार्च । होळकर स्टेडियम हे भारतीय संघाचे अभेद्य किल्ला मानला जातो. मात्र स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने तिसरी कसोटी तिसऱ्या दिवशीच ९ विकेटनी जिंकली. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील ४ सामन्यांच्या मालिकेत भारत अद्याप २-१ने आघाडीवर आहे. चौथी कसोटी ९ मार्चपासून अहमदाबाद येथे होणार आहे. पण त्याआधी भारतीय संघाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची दावेदारी अडचणीत आली आहे. WTCची फायनल या वर्षी जून महिन्यात इंग्लंडमधील ओव्हर मैदानावर होणार आहे.

भारतावर तिसऱ्या कसोटीत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने फायनलचे तिकीट पक्के केले. आता टीम इंडियाला अंतिम फेरीत पोहोचायचे असेल अखेरच्या कसोटीत विजय मिळवावा लागले.

जर भारताने अखेरची कसोटी गमावली तर…
अहमदाबाद येथील चौथ्या कसोटीत भारताचा पराभव झाला तर भारताला श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यात ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेच्या निकालावर अवलंबून रहावे लागले. WTC गुणतक्त्यात श्रीलंका तिसऱ्या स्थानावर आहे. जर त्यांनी न्यूझीलंडला दोन्ही कसोटीत पराभूत केले तर त्यांचे अंतिम फेरीत स्थान निश्चित होईल.

तिसरी कसोटी ड्रॉ झाली तर…
अहमदाबाद येथील कसोटी ड्रॉ झाली तर भारताला मालिकेत २-१ असा विजय मिळेल. याच बरोबर भारताच्या विजयाची टक्केवारी ५९ टक्के होईल. अशा परिस्थितीत WTC फायनलमध्ये पोहोचण्यासाठी श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्ध कमाल करून दाखवावा लागले. पण ही गोष्ट अतिशय अवघड आहे. न्यूझीलंडला त्यांच्या घरात कसोटीत पराभूत करणे ही कमाल श्रीलंकेला करावी लागले. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेल आहे, त्यामुळे ही गोष्ट होणारच नाही असे म्हणता येणार नाही. इंदूर कसोटीत याचा अनुभव भारतीय संघाने घेतला. विजयाची शक्यता असताना टीम इंडियाचा पराभव झाला. त्याच बरोबर अहमदाबाद येथील पराभव टीम इंडियाला झटका देऊ शकतो.

 

अशा स्थितीत भारताला श्रीलंकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागले. किंवा न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटीपैकी श्रीलंकेने किमान एक तरी गमवावी किंवा दोन्ही कसोटी ड्रॉ व्हाव्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *