राज्यात शनिवारी २,६०८ नवीन रुग्णांची नोंद ; राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली ४७ हजारांवर;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – राज्यात शनिवारी २,६०८ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ४७ हजार १९० झाली आहे. तर, ८२१ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत १३ हजार ४०४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद शनिवारी झाली असून, एकूण १,५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये ४०, पुण्यात १४, सोलापुरात २, वसई विरारमध्ये १, साताऱ्यात १, ठाण्यात १ तर नांदेडमध्ये एकाचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूंपैकी ४२ मृत्यू हे मागील २४ तासांतील असून उर्वरित मृत्यू हे मागील पंधरवड्यातील आहेत.

४ लाख होम क्वॉरंटाइनमध्ये

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ४८ हजार २६ नमुन्यांपैकी २ लाख ९८ हजार ६९६ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ८५ हजार ६२३ लोक होम क्वॉरंटाइनमध्ये असून ३३ हजार ५४५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४१ पुरुष तर १९ महिला आहेत. यात ६० वर्षे किंवा त्यावरील २९ रुग्ण आहेत तर २४ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. ७ जण ४० वर्षांखालील आहेत. या ६० रुग्णांपैकी ३६ जणांमध्ये (६० टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना : राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, तेथे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या २३४५ कंटेन्मेंट झोन क्रियाशील आहेत. शनिवारी एकूण १६ हजार ४१४ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६५.९१ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *