महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – आनंद चौधरी – संभाजीनगर : जिल्ह्यात नवे २८ करोनाबाधित आढळून आल्याने करोनाबाधितांची एकूण संख्या १२७६ झाली आहे. त्यामुळे संभाजीनगर वासियांची चिंता आणखी वाढली आहे.
जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या बाधितांमध्ये शहरातील न्याय नगर, गारखेडा येथील २, टाऊन हॉल १, सईदा कॉलनी, जटवाडा रोड ३, कैलास नगर ४, राम नगर, एन- २, सिडको ४, नारळीबाग १, गौतम नगर, जालना रोड १, संभाजी कॉलनी, सिडको १, महेश नगर १, जुना बाजार १, एमजीएम परिसर १, भवानी नगर, जुना मोंढा १, शंकुतला नगर, शहानूरवाडी १, औरंगपुरा २, आशियाद कॉलनी, बीड बायपास १, वडगाव कोल्हाटी २, अब्दाशहा नगर, सिल्लोड १ या भागातील रहिवाशांचा समावेश आहे. यामध्ये १३ महिला आणि १५ पुरूषांचा समावेश आहे.