महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – लक्ष्मण रोकडे – पिंपरी चिंचवड : उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. एकाच दिवशी 46 एकाच दिवशी रुग्ण आढळले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड परिसरात शिथिल करण्यात आलेले निर्बंध पुन्हा कडक करण्यात येणार आहेत. शहरातल्या प्रतिबंधित क्षेत्रात वाढ करण्यात येणार आहे. आणखी 15 परिसर आज रात्री 11 नंतर सील केले जाणार आहेत. या भागात शिथिल केलेले लॉकडाऊनचे नियम पुन्हा कडक करण्यात येतील.
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाची लागण झालेले 46 रुग्ण एकाच दिवशी दाखल झाले. आज दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 29 पुरुष आणि 17 स्त्रियांचा समावेश आहे. पुण्याच्या मानाने पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होता. या परिसरात दैनंदिन व्यवहार सुरळीत करायला नुकतीच परवानगी दिली होती कंटेन्मेंट झोन वगळता अन्यत्र निर्बंध शिथिल करण्यात आले होते. आता नव्या रुग्णांमुळे या प्रतिबंधित क्षेत्रातच वाढ केली जाणार आहे.