महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ मार्च । महागाईने जनता होरपळी आहे. गॅससिलिंडरचे दर 1 मार्चापासून थेट 50 रुपयांनी वाढले तर कमर्शियल सिलिंडरचे दर 350 रुपयांनी वाढले. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. आता होळीपूर्वी (Holi) सरकारने जनतेला एक चांगली बातमी दिली आहे. तूर डाळ स्वस्त (Toor Dal)होणारआहे. कारण सरकारने संपूर्ण तूर डाळीच्या आयातीवरील शुल्क रद्द केले आहे. (Import Duty On Dal) सध्या, आयातीवरील शुल्क 11 टक्के होते, जे 4 मार्च 2023 पासून म्हणजेच आजपासून शून्य करण्यात आले आहे. याबाबत अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. डाळ स्वस्त (Pulses)झाल्याने लोकांना होळीच्या सणात मोठा दिलासा मिळणार आहे.
खाद्यतेलाच्या किंमतीत थोडी घसरण
डाळीवरील 11 टक्के आयात शुल्क हटवल्यानंतर डाळींच्या किमती कमी होतील. केंद्र सरकारने सीमाशुल्क कायदा, 1962 अंतर्गत संपूर्ण तूर डाळीवरील आयात शुल्क हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भरसाठ वाढलेले खाद्यतेलाचे भावही कमी होणार आहेत.
स्थानिक खाद्यतेलाच्या बाजारात शुक्रवारी सोयाबीन रिफाइंड तेलाच्या किमतीत 10 रुपयांनी आणि पाम तेलाच्या किमतीत 10 रुपयांनी वाढ झाली. त्याचबरोबर सोयाबीनचा भाव 4800 ते 5400 रुपये रुपये प्रतिक्विंटल, तेलबिया मोहरी (निमडी) 5800 ते 6000, सोयाबीन रिफाइंड तेल 1110 ते 1115, शेंगदाणा तेल 1690 से 1710, पामतेल 1030 ते 1035 रुपये प्रतिक्विंटल आणि 1050 ते 1300 रुपये प्रतिक्विंटल झाले. (यात काही राज्यांनुसार थोडा बदल असेल.)
साखरेच्या किमतीत वाढ
एकीकडे डाळ स्वस्त होणार असताना साखर महाग होणार आहे. मध्य प्रदेशातील किराणा बाजारात शुक्रवारी साखर 3550 ते 3600, कोपरा बोरा 1950 ते 4200 रुपये प्रतिकिलो, कोपरा गोला 120 ते 140 रुपये प्रतिकिलो, हळद (उभ्या) निजामाबाद 110 ते 125, हळद (उभ्या) 110 ते 125 रुपये प्रतिकिलो 158, हळद 165 ते 185 रुपये प्रतिकिलो होती.
पिठाची किंमत पाहा किती झाली?
याशिवाय साबुदाणा 6000 ते 6500 आणि पॅकिंग 6800 ते 7000 रुपये प्रतिक्विंटल राहील. गव्हाच्या पिठाचा भाव 1480 रुपये, रवा 1560 रुपये, मैदा 1530 रुपये आणि हरभरा पीठ 3300 रुपये प्रति 50 किलो होता.
महागाईचा भडका, LPG सिलिंडरच्या दरात वाढ
दरम्यान, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ झाल्याने शहरातील लाखो ग्राहकांवर खर्चाचा बोजा वाढला आहे. (LPG Gas Cylinder Price Hike) 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत आता मुंबईत 1102.50 रुपये झाली आहे. तर व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 350.50 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे या वाढीमुळे 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत दिल्लीमध्ये 2119.50 रुपयांच्या घरात असणार आहे.
पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता
महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी रिझर्व्ह बँकेने तेरा महिन्यात रेपो दरात 2.5 टक्के वाढ केली आहे. गेल्या महिन्यातच रेपो दरात पाव टक्क्याने वाढ झाली आहे. आरबीआय पुन्हा पाव टक्क्याने रेपो रेट वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात जसं तापमान वाढेल तसा तुमचा EMI देखील भडकण्याची चिन्हं आहेत.