महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ४ मार्च । गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघातांचं सत्र सुरूच आहे. काल संध्याकाळी नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव स्कॉर्पिओ उलटून झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहीती आहे. अपघातातील जखमींनी उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे.
नागपूरहुन मुबईच्या दिशेने जात असताना राजेवाडी परिसरात स्कॉर्पिओ अचानक उलटून हा अपघात झाला आहे. अमरसिंग सवकीलाल सिंग असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून तो उत्तर प्रदेशमधील राहिवासी आहे. तसेच वीरेंद्र सिंग आणि राजे सिंग हे दोघे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातानंतर स्थानिक पोलीस प्रशासन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी अमरसिंग सवकीलाल सिंगला तपासून मृत घोषित केले. तसेच गंभीर जखमी असलेल्या दोघांवर उपचार सुरू असून या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून या महामार्गावरील आपघातांची संख्या वाढताना दिसून येत आहेत. मध्ये प्रामुख्याने अतिवेग हेच कारण दिसून येत आहे.