महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । ५ मार्च । Gold-Silver Price Today: १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ५१,८५० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ५१,७५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६६,९०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ६६,९०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार, पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८५० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५५० रुपये असेल. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ५१,८५० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५६,५५० प्रति १० ग्रॅम आहे.नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८५० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५५० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५१,८८० आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ५६,५८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६६९ रुपये आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)