महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – ओमप्रकाश भांगे – राज्यात कोरोनाग्रस्तांचा ५० हजारांच्या वर गेला आहे. मागील २४ तासात तब्बल ३ हजार ४१ रुग्ण आढळून आले. यामध्ये एकट्या मुंबईत १ हजार ७३५ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये ३८ मृत्यूंचा समावेश आहे. एकट्या महामुंबईत ३० हजार ५४२ कोरोनाग्रस्त झाले असून आतापर्यंत ९८८ जणांवर मृत्यू ओढवला आहे.
लॉकडाऊन ४.० सुरु असतानाच राज्य सरकारने आर्थिक गाडा सुरळीत करण्यासाठी अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी जनजीवन हळूहळू पुर्वपदावर येत असले, तरी दिवसागणिक वाढत चाललेला कोरोनाग्रस्तांचा आकडा पोटात गोळा आणणारा आहे. राज्यात मागील २४ तासात ५८ जणांचा मृत्यू कोरोनाने झाला. राज्यातील एकूण मृत्यूचा आकडा १ हजार ६३५ वर गेला आहे. काल मृत्यू झालेल्यांमध्ये ३९ मृत्यूंची नोंद मुंबईत झाली. त्यानंतर पुणे (६), सोलापूर (६), औरंगाबाद (४), लातूर (१), मीरा भाईंदर (१), ठाणे (१) इतक्या मृत्यूंची नोंद झाली.
राज्यात गेल्या आठदिवसापसून सलग २ हजारहून अधिक कोरोना केसेस समोर येत आहेत. राज्यात आतापर्यंत १४ हजारह ६०० जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर ३३ हजार ९८८ केसेस आहेत. राज्यात आतापर्यंत ३ लाख ६२ हजार ८६२ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
राज्यात सद्यस्थितीत ४ लाख ९९ हजार ३८७ होम क्वारंटाईनमध्ये, तर ३५ हजार १०७ संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. या एकंदरीत भयावह परिस्थितीमुळे राज्य सरकार विमानसेवा सुरु करण्यास इच्छूक नव्हते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट विरोध केला होता. तथापि, नंतर यू टर्न घेत मुंबईतून २५ विमानफेऱ्यांना परवानगी देण्यात आली.