महामारी समाप्त झाल्यानंतर तपास करता येईल ; चीन, दिली तपास करण्याची परवानगी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – ओमप्रकाश भांगे – वुहान – चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. व्हायरस सुरूवातीच्या टप्प्यात असताना चीनने जगपासून याची माहिती लपवल्याचा आरोप अनेक देशांनी केला आहे. याशिवाय वुहानच्या लॅबमध्ये व्हायरसची निर्मितीचा देखील आरोप अमेरिकेने केला होता. आता या महामारीच्या उत्पत्तीचा तपास करण्यासाठी चीन तयार झाला आहे.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, चीन कोरोना व्हायरसच्या उत्पत्ती संदर्भात आंतरराष्ट्रीय तपासासाठी तयार आहे. मात्र हा तपास राजकीय हस्तक्षेपापासून वेगळा निष्पक्ष, रचनात्मक असावा. ट्रम्प यांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, व्हायरसच्या उत्पत्तीबाबत चीनला कलंकित करणे आणि अफवा पसरवण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचे प्रयत्न अयशस्वी झाले आहेत.

दरम्यान, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाने व्हायरसच्या उत्पत्ती संदर्भात आंतरराष्ट्रीय तपासाची मागणी केली होती. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या बैठकीत चीनचे राष्ट्रपती शी जिनफिंग यांनी या तपासास नकार दिला होता. जिनफिंग म्हणाले होते की महामारी समाप्त झाल्यानंतर तपास करता येईल. मात्र आता अचानक चीनने तपास करण्यास परवानगी दिल्याने सर्वांना हैराण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *