Addiction : तुम्हाला देखील हि सवय असेल तर आताच बदला नाहीतर तुमचा ब्रेन होणारअसा डॅमेज

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०८ मार्च । आज फोन प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग झालाय. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच फोन वापरतात आणि प्रत्येकाची फोनची अत्यंत सवय झाली आहे. उठता बसता फोन, चालता बोलता फोन, अगदी फोनशिवाय माणूस जगूच शकत नाही पण तुम्हाला माहिती आहे का, नकळत हा फोन आपल्याला किती इजा पोहचवतोय?

अनेकांना दिवसभर फोन जवळ ठेवण्याची सवय असते. अनेकजण वारंवार फोन चेक करत असतात पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुमच्या या वारंवार फोन चेक करण्याची सवय किती घातक आहे. होय, हे खरंय. वारंवार फोन चेक करत असण्याच्या सवयीमुळे तुमचा ब्रेन डॅमेज होऊ शकतो. तुम्ही म्हणाल कसा, चला जाणून घेऊया.

फोनचे हे व्यसन अनेकदा आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम करतात. अनेकदा वारंवार फोन चेक करण्याची सवय आपल्या ब्रेनला डॅमेज करू शकते. ब्रिटीश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्च रिपोर्टनुसार, वारंवार फोन चेक केल्याने बौद्धिक क्षमता खालावते.

यामुळे बुद्धीवर आणि विशेषत: ब्रेनवर परिणाम होतो. ज्यामुळे ब्रेन स्लो काम करायला लागतो. जसे की लवकर निर्णय घेणे, जमत नाही. खूप विचार करणे, सतत डोकेदुखी होणे, इत्यादी.

सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटीने वारंवार फोन चेक करत असण्याच्या सवयीवर संशोधन केले. तेव्हा असे दिसून आले की वारंवार फोन चेक करत असल्यामुळे लिमिटपेक्षा जास्त स्क्रिन टाईमला सामोरे जावे लागते आणि त्यामुळे तीव्र डोकेदुखी असो की ब्रेन होणारा विपरीत परिणाम स्पष्टपणे दिसून येतो.


वारंवार फोन चेक करण्याच्या सवयीचे तोटे

फोकट हटतो. कामात लक्ष लागत नाही.

काम अपूर्ण राहतं

फोनची सवय लागते

सतत फोन वापरत असल्याने बोलताना शब्द सुचत नाही.

मेंदूवर कंट्रोल राहत नाही.

वेळ वाया जातो.

डोकेदुखी होणे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *