Nagaland Politics : लोकशाहीची हत्या? राष्ट्रवादीच नाही, सगळेच विरोधक भाजपसोबत सत्तेत जाण्याची चर्चा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ मार्च । नुकतेच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सात आमदार निवडून आलेले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादी हा नागालँडमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इतकेच नाही तर नागालँडमध्ये सर्वच्या सर्वच विरोधी पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

नागालँड मध्ये विधानसभेच्या ६० जागा आहेत, येथे भाजप आणि एनडीपीपी या दोन पक्षांनी स्पष्ट बहुमत सत्ता स्थापन केली आहे. या आघाडीला साठ पैकी ३७ जागा मिळाल्या आहेत. यादरम्यान तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष राष्ट्रवादी काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागालँडमध्ये पुर्णपणे सर्वपक्षिय सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. येथे एकही पक्ष विरोधात बसायला तयार नसून सर्वच विरोधी पक्ष हे सत्तेत सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे.

नागालँडमध्ये २०१५ पासून हे घडत आले आहे. मात्र या वेळी विजेत्या पक्षांचा शपथविधी होण्याच्या आगोदरपासूनच विरोधकांनी सत्तेत सहभागी होण्याचा सूर आळवणे सुरू केले आहे. राष्ट्रवादीचे नेते देखील इच्छूक असल्याची माहिती समोर आली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *