24 तास AC चालू राहिला तरी कमी येणार बिल ; कसं वापरा या 6 सोप्या ट्रिक्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ मार्च । ऊन आणि पाऊस असं विचित्र वातावरण सध्या झालं आहे. पाऊस जरी पडत असला तरी देखील उष्णता वाढत आहे. त्यामुळे घरात आता एसी हवा असं वाटायला लागलं आहे. काहीजण एसी घेण्याच्या मागावर आहेत तर काहींनी आधीच घेतला आहे. आता विजबिलात देखील वाढ होणार असल्याची 1 एप्रिलपासून चर्चा आहे. एसी म्हटलं की विजबिल जास्त येतंच.

आता तुम्ही २४ तास एसी सुरू ठेवला तरी तुमचं बिल कमी येणार आहे. यासाठी आम्ही काही ट्रिक्स आणि टिप्स सांगणार आहोत. तुम्ही जर त्या न चुकता फॉलो केल्या तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल.

तुम्ही AC ला योग्य डिफॉल्ट तापमानावर सेट करून द्या त्यामुळे 6 टक्के विजेची बचत होते. तुम्ही AC चं तापमान जेवढं कमी कराल तेवढं तुमचं बिल जास्त येणार आहे. त्यामुळे डिफॉल्ट तापमान ठेवण्यावर भर द्या.

तुमचा AC १८ डिग्रीवर ठेवण्यापेक्षा 24 डिग्री सेल्सियसवर ठेवा. दिवसा तापमान 34 ते ३८ डिग्रीपर्यंत असतं. त्यासोबत आपल्या शरीराचं तापमान 36 ते 37 डिग्री असतं. या खाली असलेलं तापमान हे नेहमी आपल्या शरीरासाठी थंडच असतं. त्यामुळे त्यामिुळे साधारण 23-24 वर एसी ठेवला तर योग्य कूलिंग होतं आणि बिलही वाढत नाही.

AC सुरू असताना इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करणं टाळलं पाहिजे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या रुममध्ये AC सुरू आहे ती खोली नीट बंद करून घेणं आवश्यक आहे. सूर्याच्या किरणांनी एसीवरचा लोड वाढतो. याशिवाय एसी सुरू असताना इतर इलेक्ट्रिक उपकरणं वापरली तर घरातील उष्णता वाढते. त्यामुळे खोली थंड होण्यासाठी जास्त वेळ जातो.

तुम्ही जर खूप वेळासाठी रूम थंड करू इच्छित असाल विशेषत: रात्रीच्या वेळी तर एसीचं तापमान सेट करून चालू ठेवा. काही वेळानंतर एसी 2 तासांसाठी बंद करा. त्यानंतर पुन्हा सुरू करा आणि 2 तासांसाठी बंद करा. असं केल्यानं विजेची खूप बजत होते आणि बिलही कमी येतं.

एसीसोबत पंख्याचाही उपयोग करा. एसीचं तापमान कमी न ठेवता 24 वर ठेवावं आणि त्यासोबत पंखा सुरू ठेवा म्हणजे रुम थंड राहील. तुम्ही थोड्यावेळानं एसी बंद करू शकता. दुसरं म्हणजे एसी सुरू करण्याआधी पंखा थोडावेळ चालू ठेवा ज्यामुळे रुममधील गरम हवा बाहेर जाईल आणि त्यानंतर एसी सुरू करा म्हणजे रुम लगेच थंड होईल.

एसी सतत चालू असल्याने त्याचं सर्व्हिसिंग करणं आवश्यक आहे. एसीला रुममधील हवा थंड करण्यासाठी जास्त कष्ट करावे लागतात. त्यामुळे त्याचे फिल्टर देखील खराब होतात. ते काढून स्वच्छ करणं बदलणं या गोष्टी योग्य वेळी केल्या तर विजबिलात 5 ते 15 टक्क्यांनी फरक पडतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *