राज्याच्या राजकारणाला मिळणार नवे वळण ? भाजपच्या ‘प्रस्तावा’वर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .८ मार्च । ‘मनभेद विसरा म्हणजे काय करा, माझ्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नाही आणि तुम्ही (पत्रकारांनी) त्यांच्याकडून अधिक स्पष्ट करा’ असं म्हणत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया दिला.

महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र या अशी सादच चंद्रशेखर बावनकुळे यांनी घातली होती. त्यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. मनभेद विसरा म्हणजे काय करावे, माझ्याकडे असा कोणताही प्रस्ताव आला नाही आणि तुम्ही (पत्रकारांनी) त्यांच्याकडून अधिक स्पष्ट करावे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

तसंच, जे त्यांच्यासोबत गेलेले नाही, राजन साळवी, नितीन देशमुख, अनिल परब त्यांच्यावर ज्या धाडी पडल्या आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. नगरसेवकांचीही चौकशी सुरू आहे. त्या गोष्टी नेमक्या काय आहे, त्या सुडामध्ये येत नाही का? सूड भावनेनं पेटून तुम्ही सत्तेचा दूरउपयोग करत आहे. आता सुद्धा मी खेडच्या सभेत सांगितलं आहे, कुटुंबच्या कुटुंब आरोपाची राळ उडवून उद्ध्वस्त करायची, तरी होत नाही म्हणून लाळघोटेपणाने मांडीला मांडी लावून बसायचे, हेच मेघालयात दिसत आहे, अशी टीकाही ठाकरेंनी केली.

मेघालयामध्ये मोदी आणि शहा यांनी सर्वात भ्रष्ट राज्य असल्याचा प्रचार केला होता. सर्वसामान्य जनतेचा पैसा खाला, केंद्राच्या योजना पोहोचून दिल्या नाही, असा प्रचार केला. आता मेघालयमध्ये 1 ते 2 आमदार निवडून आले आहे, त्यांची केविलवाणी परिस्थिती आहे. पुन्हा त्यांच्या बाजूला जाऊन बसले आहे. आपल्यासोबत आले ते धुतलेले तांदूळ आहे का? असा सवालही ठाकरेंनी विचारला.

आमच्याकडे असलेल्या अनेक आमदारांवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांच्यावर काय मग गोमूत्र शिंपडले आहे का, आता आमची जी माणसं तुमच्याकडे येत नाही, त्यांच्यावर काय आरोप सुरू आहे. तुमच्याकडे आले तर ते स्वच्छ होणार आहे का? हा सत्तापिपासूपणा आहे, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

गेली 28 वर्ष भाजपचा बालेकिल्ला पार भुईसपाट करून जिंकू शकतो. हा आत्मविश्वास मिळाला असून पुणेकरच नाहीतर, सर्वांना दिलासा मिळाला आहे. आज एकत्र लढलो आहोत, पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढणार आहोत, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असंही ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *