![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वात जास्त मान आंब्याला असला तरी कलिंगडाची फॅन फॉलोईंग सुद्धा कमी नाही. अनेकदा आपण हौशीने कलिंगड घेऊन येतो खरं पण ते आतून अगदीच पांढरं आणि अगोड निघते. मग एकीकडे पैसे वाया गेल्याचा आणि दुसरीकडे एवढा जड कलिंगड उचलून आणल्याचा पश्चाताप होतो तो वेगळाच. खरंतर आपण बाजारात कधीही फळे विकत घेता ना ‘गोड आहे ना?’ हा प्रश्न विचारतोच पण तुम्हीच सांगा ज्यांना ते फळ विकायचेच आहे ते नेहमीच खरं सांगतील का? त्यामुळे आज आपणच न कापता, न चाखता कलिंगड गोड आहे की नाही हे कसे ओळखायचे हे पाहणार आहोत.
कलिंगडाची शेंडी तपासायची. ती सुकलेली असली की समजायचं की फळ तयार आहे. म्हणजेच आतून लाल झालंय. आणि लाल झालं असेल तर ते गोड असणार.
काही कलिंगडवर पांढरे डाग असतात,काहींवर पिवळे तर काहींवर केशरी – पिवळे.पांढरा डाग असलेला कलिंगड कधीही घेऊ नये.शक्यतो पिवळसर किंवा केशरी पिवळसर डाग असलेला कलिंगड खूप गोड असतो.
ही जाळी म्हणजे पोलीनेशन प्रक्रियेच्यावेळी माश्यांनी अधिक वेळा फुलांना स्पर्श केला आहे.जास्त जाळी म्हणजे गोड कलिंगड.
कलिंगडावर हाताने फटका मारा, जर पोकळ आवाज आला तर समजा कलिंगड पिकला आहे.
तुम्ही कलिंगड लहान घ्या किंवा मोठा , तो वजनाने जड असायला हवा.
