Investment Tips : करोडपती होणे एकदम सोप्पे ! हा नियम जाणून घ्या

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । जगात प्रत्येकाला श्रीमंतीचे स्वप्न पडतेच. प्रत्येकाला श्रीमंत व्हावे वाटते. त्यात गैर पण काहीच नाही. जगातील अनेकांची कमाई चांगली आहे. तरीही ते श्रीमंत नसतात. तुम्हाला करोडपती (Crorepati) व्हायचे असेल तर त्यासाठी योग्य गुंतवणूक (Investment) करावी लागेल. मध्यमवर्ग असो वा गरीब, प्रत्येकाने आर्थिक नियोजन आणि स्वयंशिस्त अंगिकारली तर त्यांनाही श्रीमंत होता येते. त्यासाठी तज्ज्ञांच्या मते 15*30*20 हा नियम काही येतो. काय आहे हा नियम? ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुम्ही कोट्याधीश व्हाल. तरुणपणीच अर्थनियोजन करणे आवश्यक आहे. पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीचे पर्याय निवडणे आवश्यक आहे.

पैशांचे व्यवस्थापन करणे, त्याचे नियोजन करणे सोपे काम नाही. पैसा हाती असला की तो खर्च करण्यासाठी हात शिव शिवतात. कधी एकदा काही खरेदी करतो, असे अनेकांना होते. त्यांना खर्च करण्याची इच्छा होते. त्यासाठी 15*30*20 हा नियम उपयोगी ठरतो. हा पैसा वाचविण्याचा एक शानदार फॉर्म्युला आहे. त्यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाल. हा फॉर्म्युला तुमची मिळकत, कमाई, उत्पन्न तीन भागात वाटतो.

हा फॉर्म्युला तुमची कमाई तीन भागात वाटणी करतो. त्यात तुमच्या गरजा, इच्छा आणि बचत यांचा समावेश आहे. या नियमानुसार, तुमच्या कमाईचा 50 टक्के वाटा भाडे, किराणा, वाहतूक आणि इतर किरकोळ गरजा पूर्ण करण्यावर खर्च होतो. तर 30 टक्के रक्कम ही हॉटेलिंग, मनोरंजन, खरेदी यावर खर्चासाठी राखीव ठेवा. तर 20 टक्के रक्कम ही भविष्यातील आर्थिक लक्ष गाठण्यासाठी हाताशी ठेवा. ही रक्कम तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरता येईल.

15*30*20 हा नियम तुम्ही कसोशिने पाळला तर तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमची बचत वाढेल. ही बचत तुम्ही एसआयपीच्या माध्यमातून गुंतवू शकता. त्यामुळे चांगल्या योजनेत तुम्हाला अल्पबचतीच्या माध्यमातून मोठा निधी उभारता येईल. चक्रव्याढ व्याजाच्या मदतीने तुम्हाला लॉन्ग टर्म रिटर्न मिळतील. म्युच्युअल फंडातील एसआयपीच्या माध्यमातून मोठा निधी उभारता येतो.

15 वर्षांसाठी 15 टक्के व्याजदराने प्रत्येक महिन्यात 15,000 रुपयांची गुंतवणूक कराल तर तुम्ही एकूण 27 लाख रुपये गुंतवाल. त्यावर व्याजाचा विचार केला तर 73 लाख रुपयांचा परतावा मिळेल. या मुद्दल आणि व्याज यांची सांगड घातली की ही रक्कम 1,00,27,601 रुपये इतकी होईल. पण त्यासाठी नियमीत निश्चित रक्कम दीर्घकाळासाठी गुंतवावी लागेल. जर तुम्ही 15 हजार रुपये 30 वर्षांसाठी गुंतवाल तर इतका मोठा फंड जमा होईल की, पुढे तुम्हाला आरामशीर आयुष्य घालवीता येईल. आनंदाने आयुष्य जगात येईल. एवढंच नाही तर परदेशातही प्रवास करता येईल. जग फिरता येईल. पण त्यासाठी तरुणपणीच अर्थनियोजन करणे आवश्यक आहे. पहिल्या पगारापासूनच गुंतवणुकीचे पर्याय निवडणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *