Heat wave: राज्यातील काही जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टी, उष्णतेच्या लाटेचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसला. याचा मानवी आरोग्य आणि शेतीवर देखील गंभीर परिणाम दिसून आला. त्यानंतर IMD ने 8 आणि 9 मार्च रोजी कोकण किनारपट्टीलगत गोवा आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोकण विभागासह गोव्यातील तापमान २ ते ३ अंशाने वाढणार असून, येथील हवामानात उष्णता जाणवणार आहे. तर मध्य भारत आणि संपूर्ण राज्यात पुढचे दोन दिवस ४ ते ६ अंशाने तापमानात वाढणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *