अदानींवरील संकटं थांबेनात ; ‘या’ ३ कंपन्यांचे स्टॉक रडारवर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .०९ मार्च । अब्जाधीश गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूहासमोर आता नवीन संकट येऊन उभे राहिले आहे. तब्बल महिन्याभराच्या घसरणीनंतर आता शेअर्समध्ये आलेली तेजी अदानी ग्रुपसाठी डोकेदुखी बनली आहे. अदानींच्या शेअर्समध्ये जेव्हा हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालामुळे घसरण सुरु झाली होती, तेव्हा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने (एनएसई) समूहाची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्रायझेससह तीन शेअर्सवर अल्प-मुदतीसाठी पाळत ठेवली होती. मात्र, आता समूहाच्या पुन्हा तीन कंपन्यांना – अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर आणि अदानी विल्मार – या चौकटीत ठेवण्यात आले असून अलीकडेच शेअर्समधील वाढ यामागचे कारण आहे.

राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) एका परिपत्रक जारी करत म्हटले की हे तीन स्टॉक आजच या फ्रेमवर्कमध्ये ठेवले आहेत. अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सुमारे महिनाभर या चौकटीत राहिला आणि एका दिवसापूर्वी त्यातून बाहेर काढण्यात आले होते. तर दुसर्‍या परिपत्रकानुसार अदानी ग्रीन एनर्जी आणि NDTV ला गुरुवार म्हणजेच आजपासून दीर्घकालीन अतिरिक्त देखरेखीच्या स्टेज-१ वरून स्टेज-२ मध्ये हलवण्यात आले आहेत. स्टॉकमधील उच्च अस्थिरतेच्या बाबतीत एक्सचेंज त्यांना अल्पकालीन किंवा दीर्घकालीन अतिरिक्त देखरेख फ्रेमवर्कमध्ये ठेवते.

अदानी शेअर्सची वाटचाल
बुधवारी सलग सहाव्या दिवशी अदानी शेअर्समध्ये वाढीचा कल दिसून आला. यापूर्वी, एक महिन्यापेक्षा जास्त काळ शेअर्समध्ये घट झाली होती, पण अलीकडच्या काळात अनेक सकारात्मक पावलांमुळे समूहाच्या समभागांनी वेगाने कामकाज करण्यास सुरुवात केलीय. गेल्या आठवड्यात, GQG पार्टनर्सने अदानी समूहाच्या चार कंपन्यांमध्ये मोठी गुंतवणूक केली असून समूहाने ७ हजार ३७४ कोटींच्या कर्जाची मुदतआधीच परतफेड जाहीर केली होती. यामुळे समूहाचे शेअर्स वाढले आणि त्याचे मार्केट कॅपने ९ लाख कोटींचा टप्पा पार केला.

अदानी शेअर्सला अप्पर सर्किट
बुधवारी अदानी समूहाच्या सर्व शेअर्समध्ये तेजी राहिली. अदानी एंटरप्रायझेसचा स्टॉक जवळपास ३ टक्के वाढीसह क्लोज झाला, तर इतर पाच समभागांनी ५ टक्के अप्पर सर्किटला धडक मारली. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी, अदानी पॉवर, अदानी विल्मर, अदानी ट्रान्समिशन आणि अदानी टोटल गॅस यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *