महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – बीड – आकाश शेळके : कोरोनाशी आपण चांगले लढत आहोत. पण यापुढची स्थिती अधिक बिकट असणार आहे. त्यामुळे या कोरोनाचा गुणाकार वाढत जाईल. धोका वाढेल, पण काळजी करण्याचं कारण नाही. राज्यात मोठ्या प्रमाणात चाचण्या सुरू आहे. आरोग्य व्यवस्था मोठ्या प्रमाणात कामाला लागली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. इतकंच नाही तर पोकळ घोषणा करणारं हे सरकार नाही अशा शब्दात मुख्यमंत्र्यानी केंद्राच्या पॅकेजवर जोरदार टीका केली आहे. ते फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
* मे अखेरीला राज्यात सव्वा ते दीड लाख कोरोना रुग्ण दिसतील, असं केंद्राच्या टीमने सांगितलं होतं. तेवढ्या नाहीत तरी आपल्याकडे कोरोनारुग्ण वाढत आहेत. आता अॅक्टिव्ह केसेस 33000 आहेत.
* पुढच्या काही काळात कोरोनाची प्रकरणं वाढणार आहेत. विषाणूच्या संसर्गाचा गुणाकार वाढतो आहे. पावसाळ्यात आणखी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
* जरा लक्षणं दिसलं तरी डॉक्टरांकडे गेलं पाहिजे.
* सर्दी खोकल्यापेक्षा ताप येणं, थकवा येणं, वास येत नाही, तोंडाची चव जाणं ही नवी लक्षणं आहेत. ती अंगावर काढू नका. ती कोरोनाची प्राथमिक लक्षणं असू शकतात.
* पावसाळ्यात जास्त खबरदारी घेण्याची गरज, बाहेर फिरायला जाऊ नका.
* व्हायरस कुणाकडे पोहोचायच्या आत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायचं – हे आपलं धोरण आहे
* 6 ते 7 लाखांपर्यंत मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवलं
* राज्याने आतापर्यंत 3 लाख मजूरांना बसने घरी पाठवलं
* आपण रोज 80 ट्रेनची मागणी करतो, प्रत्यक्षात 40 मिळाल्या
* राज्याने आतापर्यंत 481 ट्रेन पाठवल्या
* राज्याने एसटीसाठी 75 कोटी रुपये दिले
* मनोरंजन, खेळ अशा अनेक बाबींना परवाणगी देण्याचा विचार करू
* हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे कोणीही राजकारण करू नये. तुम्ही करा. मी राजकारण करणार नाही कारण माझ्यावर राज्याची जबाबदारी आहे. मी प्रामाणिकपणे काम करत आहेत. त्यामुळे मला काम करू द्या.
* सध्या माणूसकी हा सगळ्यात मोठा धर्म आहे
* 31 तारखेपर्यंत लॉकडाऊन उठणार हा काही हो किंवा नाहीचा मुद्दा नाही. त्यामुळे याबद्दल सध्या काही सांगू शकत नाहीत.
* कोरोनाचा आकडा वाढणार आहे. त्यामुळे कृपा करून कोणीही काम बंद करू नका. सर्व आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्र सरकार खंबीर आहे.