महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० मार्च । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 17व्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम ठाण्यात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा खास त्यांच्याच शैलीत जोरदार फटकेबाजी केली. संदीप देशपांडेंवर झालेला हल्ला, उद्धव ठाकरेंचं गेलेलं मुख्यमंत्रीपद, हिंदूत्व तसंच मनसेने केलेली आंदोलनं या वेगवेगळ्या मुद्द्यांवर राज ठाकरेंनी थेट भूमिका घेतली. तसंच 22 मार्चला गुढी पाडव्यानिमित्त शिवाजी पार्कवर जाहीर सभा होणार आहे, या सभेत सगळे वाभाडे काढणार असल्याचंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
-कोणतीही सत्ता नसतान तुमची उर्जा सोबत आहे .
– संदीप देशपांडे आत्मचरित्राची चार पाने वाढली त्या दिवशी काही बोललो नाही. अनेक विषय मी २२ तारखेला बोलेन. जे पक्ष सोडून गेले ते एक एकटे गेले.
– भाजपने लक्षात ठेवावे आज भरती सुरू आहे ओहटी येऊ शकते.
– राजू पाटील एक ही है लेकीन काफी है.
– मनसेने जेवढी राजकीय आंदोलने घेतली तेवढी कोणी घेतली नाहीत. मशिदीवरील भोंगे बाबत २२ तारखेला बोलेन. नाशिक मध्ये काम केलं लोकांना नेमकं काय हवंय. नाशिक मध्ये जेवढं काम झालं तेवढं २५ वर्षात काम झालं नाही.
– ५ वर्षात कोणावरही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही. पाण्याचा प्रश्न नाशिक मध्ये सोडवला. मोबाईलवर मराठी मनसेमुळे ऐकु आलं.
– हात सोडून सांगितले मग थेअटर्स वाले ऐकु लागले. हिंदुत्वाला मानता म्हणजे नेमकं काय असंत तुमचं. भोंगा प्रकरणानंतर अयोध्येला विरोध करणारे हिंदुत्ववाले.
– ज्यांनी हे सगळं केलं त्याचं पुढे काय झालं.१७ हजार सैनिकांवर केसेस टाकल्या, आमच्या वाटेला जायचं नाही. त्यामुळेच मुख्यमंत्रिपद गेले.
– आपण सत्तेपासून दूर नाही आहोत, मी आशा दाखवत नाही मला माहिती आहे ते कठीण आहे. पण महापालिका निवडणुका कधी होणार कळतं नाही आहे. नापास झालं असं वाटत आहे. महापालिकेच्या निवडणुका होऊ देत आपण सत्तेत असणार, जनता सगळ्यांना विटलेली आहे.
– मला जे काही वाभाडे काढायचे आहेत ते २२ तारखेला.
– महापालिका निवडणुका कधी होणार कळतं नाही आहे. आता तर नापास झालं असं वाटत आहे.