सतीश कौशिक यांच्या होळी पार्टीच्या फार्म हाऊसमधून सापडली औषधे:फार्म हाउसचा मालक फरार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .११ मार्च । अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांच्या मृत्यूचा तपास करत असलेले पोलीस शनिवारी दिल्लीतील फार्म हाऊसवर पोहोचले. कौशिक यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी येथे होळी पार्टीला हजेरी लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फार्म हाउसच्या झडतीमध्ये पोलिसांना काही औषधे सापडली. पोलिसांना फार्म हाऊसच्या मालकाची चौकशी करायची होती, मात्र तो फरार आहे.

सतीश कौशिक यांचे बुधवारी रात्री दीड वाजता दिल्लीत अचानक निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद परिस्थितीत झाला आहे. त्यामुळेच त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्याचा सविस्तर अहवाल अद्याप आलेला नाही. तथापि, प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालात मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे नमूद केले आहे.

फार्म हाऊसचा मालकही एका प्रकरणात वॉन्टेड
वृत्तसंस्थेनुसार, एका उद्योगपतीच्या फार्म हाऊसवर होळी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. हा उद्योगपती पार्टीत उपस्थित होता आणि एका प्रकरणात तो स्वतः वॉन्टेड आहे. त्याची चौकशी करण्यासाठी पोलीस आले होते, मात्र तो सापडला नाही. त्याचा शोध सुरू असून पोलीस पार्टीत सहभागी झालेल्या पाहुण्यांची यादीही तपासत आहेत.

रुग्णालयातून पोलिसांना मृत्यूची बातमी मिळाली
मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांचे म्हणणे आहे की सतीश यांच्या मृत्यूची बातमी हॉस्पिटलमधून मिळाली. पोलिसांचे म्हणणे आहे की, तब्येत बिघडल्याने कौशिक रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत कोण होते, त्याचे काय झाले? त्याची पडताळणी केली जात आहे. या लोकांची चौकशी केली जाईल. मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलीसही व्हिसेरा अहवालाची वाट पाहत आहेत.

सतीशचा यांचा जन्म हरियाणामध्ये झाला, शालेय शिक्षण दिल्लीतून
सतीश कौशिक यांचा जन्म 13 एप्रिल 1956 रोजी हरियाणातील महेंद्रगड येथे झाला. शालेय शिक्षण दिल्लीत झाले. किरोडीमल महाविद्यालयातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) मध्ये प्रवेश घेतला. 1985 मध्ये त्यांनी शशी कौशिकसोबत लग्न केले. त्यांच्या मुलाचे वयाच्या 2 ऱ्या वर्षी निधन झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *