महाराष्ट्र 24 ऑनलाईन : विशेष प्रतिनिधी : निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल भिंतीवर करोडो रुपये खर्च करून संत तुकाराम महाराज व इतर छायाचित्र कलर करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी करोडो रुपये खर्च करून भिंतीवर तैलचित्र रंगवून शोभा वाढवली होती त्या ठिकाणी पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिका बी आर टी प्रशासन ह्यांनी आज पांढरा रंग लावून जाहिराती साठी पेंटिंग काम सुरू केले होते त्या ठिकाणी ते पेंटिंग काम थांबवून विरोध करण्यात आला असून स्थानिक भूमिपुत्र बंडू काळभोर तसेच इतर व्यापारी वर्गाने विरोध दर्शविला असून मधुकर पवळे उड्डाणपूल येथील जाहिरात पेंटिंग काम बंद पाडण्यात आले सचिन काळभोर बंडू काळभोर राजू काळभोर तसेच इतर व्यापारी वर्गाने सदर निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल तैलचित्र लावलेले ठिकाणी पुन्हा जाहिरात पेंटिंग करत असताना विरोध करण्यात आला.
मधुकर पवळे उड्डाणपूल खाली पार्किंग बंद करून त्या ठिकाणी हातगाडी धारक व टपरीधारक ह्यांनी अतिक्रमण केले असून भिकारी ह्यांनी संसार थाटला असून निगडी येथील मधुकर पवळे उड्डाणपूल ह्या ठिकाणी बकालपणा निर्माण झाला असून करोडो रुपये खर्च पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन ह्यांनी गेल्या वर्षी केला होता.