Horoscope Today दि . १९ मार्च ; या राशीच्या लोकांना दिवस आरामदायी ; पहा बारा राशींचं भविष्य.

 54 total views

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ मार्च ।

मेष:-
आज जवळच्या प्रवासात खबरदारी घ्यावी. मानसिक द्विधावस्था जाणवू शकते. आवडीची कामे करण्यावर भर द्यावा. नामस्मरणासाठी वेगळा वेळ काढावा. तरूणांशी मैत्री कराल.

वृषभ:-
आज तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. फॅशनची हौस पूर्ण कराल. धार्मिक कार्यात हिरीरीने भाग घ्याल. वाणीत गोडवा ठेवाल. घरगुती कामात वेळ जाईल.

मिथुन:-
आज मनातील संभ्रम दूर करावेत. सरकारी कामे वेळ लावू शकतात. वाताचा त्रास जाणवू शकतो. संसर्गजन्य विकारांपासून काळजी घ्यावी. वारसाहक्काची कामे चिघळू शकतात.

कर्क:-
आज भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. जोडीदाराचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न करावा. मानसिक ताण-तणावापासून दूर राहावे. वरिष्ठांची मर्जी संपादन करावी. वडीलधार्‍यांचा सल्ला घ्यावा.

सिंह:-
आज मनातील इच्छा पूर्ण होईल. अंगीभूत कलेला प्रोत्साहन मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. जोडीदाराशी सल्ला मसलत कराल. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत.

कन्या:-
आज जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. मानसिक संभ्रम दूर करावेत. वेळेचे बंधन पाळावे लागेल. कामातील द्विधावस्था त्रासदायक ठरू शकते. मुलांचे वागणे विरोधी वाटेल.

तूळ:-
आज घरगुती परिस्थिती शांतपणे हाताळा. प्रलोभनापासून दूर राहावे. कामात आळस आड येऊ शकतो. इतरांना स्वेच्छेने मदत कराल. संयम बाळगावा लागेल.

वृश्चिक:-
आज साहस करताना सावधानता बाळगावी. योग्य मार्गाचा अवलंब करावा लागेल. भावंडांचे प्रश्न सामोरी येतील. जोडीदाराची मर्जी राखावी लागेल. प्रवासात खबरदारी घ्यावी लागेल.

धनू:-
आज कौटुंबिक प्रश्न शांततेने सोडवावेत. मानसिक दोलायमानता वाढू शकते. स्वत:वरील विश्वास डळमळीत होऊन देऊ नका. कायदेशीर कामात वेळ जाईल. नवीन मित्र जोडाल.

मकर:-
आज प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. अघळ-पघळ गप्पा माराल. नवीन विचारांची कास धरावी लागेल. हातातील अधिकारांचा वापर करावा. चिकाटी सोडून चालणार नाही.

कुंभ:-
आज हजरजबाबीपणे वागाल. सामुदायिक वादांपासून दूर राहावे. धार्मिक यात्रेचे योग येतील. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.

मीन:-
आज श्रम काही प्रमाणात वाढू शकतात. कागदपत्रे जपून ठेवावीत. हस्त कलेचे कौतुक केले जाईल. अती श्रमाचा थकवा जाणवेल. योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *