(औरंगाबाद ) संभाजीनगर ला करोनाचा विळखा, रुग्णसंख्या १३२७

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – संभाजीनगर – विशेष प्रतिनिधी – शहरात करोना व्हायरसचा धोका दिवसागणिक वाढतच चालला आहे. मंगळवारी  जिल्ह्यात २२ करोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये ११ महिला आणि ११ पुरुषांचा समावेश आहे. आज वाढलेल्या रूग्णामुळे संभाजीनगरमधील करोनाग्रस्तांची एकूण संख्या १३२७ इतकी झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) १३ करोनाबाधितांवर यशस्वी उपचार झाल्याने ते सोमवारी घरी परतले आहेत. करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये बेगमपुरा, गोगा बाबा मंदिर, उस्मानपुरा, गांधी नगर, हिमायत नगर, रेंगटीपुरा, मकसूद कॉलनी, अक्सा मस्जिद, बारी कॉलनी, शहा बाजार, वैजापूर, अन्वा-भोकरदन या भागातील आहेत. शहरातील चार आणि सिल्लोड येथील एका करोनाबाधिताचा अशा एकूण पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे घाटी प्रशासनाने सांगितले. घाटीत आतापर्यंत ५० कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. सध्या घाटी रुग्णालयात ७० कोरोनबाधितांवर उपचार सुरू असल्याचेही प्रशासनाने कळवले आहे.

कोविड केअर केंद्रातून ८९ करोनामुक्त –
मनपाच्या कोविड केअर केंद्रातून सोमवारी एकूण ८९ करोनाबाधितांना ते बरे झाल्याने सुटी देण्यात आली. तर शहरातील दोन खासगी रुग्णालयात आतापर्यंत चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे, असे मनपा प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे.
मंगळवारी आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) –
जुना मोंढा (1), बायजीपुरा (1), रोहिदासपुरा (1), कांचनवाडी (1), भारतमाता नगर हडको(1), नवीनवस्ती जुनाबाजार (4), जुना हनुमान नगर (1), हनुमान चौक (1), न्याय नगर (1), कैलाश नगर (1), रामनगर (1), एन 8 सिडको (4), रोशन गेट (1), एन11 सुभाषचंद्र नगर (1), पुंडलीक नगर (1), भवानी नगर (1) या भागातील कोरानाबाधित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *